धक्कादायक! पोहण्यासाठी गेलेली अभिनेत्री अचानक बेपत्ता

बराच शोध घेऊनही.... 

Updated: Jul 9, 2020, 05:41 PM IST
धक्कादायक! पोहण्यासाठी गेलेली अभिनेत्री अचानक बेपत्ता  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

कॅलिफोर्निया : कलाविश्वातून गेल्या काही दिवसांपासून अत्यंत धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्यातच आता आणखी एका घटनेची भर पडली आहे. जेथे एका अभिनेत्रीच्या अचानकच बेपत्ता होण्यानं खळबळ माजली आहे. 
नाया रिवेरा Naya Rivera नावाची हॉलिवूड अभिनेत्री अचानकच गायब झाली असून तिच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला जात आहे. काही हॉलिवूड चित्रपट आणि 'ग्ली' या म्युझिक सीरिजमुळं नाया प्रसिद्धीझोतात आली होती. बुधवारी दुपारी कॅलिफोर्नियातील लेक पिरू येथे एका होडिमध्ये तिचा  ४ वर्षांचा मुलगा जोसी एकटाच होडीमध्ये दिसला. या ठिकाणी नायाचं असणं अपेक्षित होतं. 

आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये चर्चेत असणाऱ्या वृत्तांनुसार Ventura County Sheriff विभागाकडून तलावात बुडालेल्या आणि संशयास्पद मृत्यू झालेल्या व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे. या अभिनेत्रीनं तिच्यामुलासमवेत काही वेळ व्यतीत करण्यासाठी म्हणून दुपारच्या वेळेसाठी एक होडी बुक केली होती. पण, ही होडी ठरलेल्या वेळेत परत आली नसल्यामुळं परिस्थिती चिंतेच्या वळणावर पोहोचली. त्यातच या होडीमध्ये नायाचा मुलगा होता, पण नाया मात्र कुठेच दिसली नाही. 

सूत्रांच्या माहितीनुसार नाया या तलावात पोहण्यााठी उतरली होती. पण, ती परतली नाही. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीनं नायाचा शोध घेण्यासाठीचं बचावकार्य हाती घेतलं. रात्रीच्या वेळी काही तासांच्या विरामानंतरही हे कार्य सुरुच ठेवलं. त्यामुळं या घटनेकडे अनेकांचं लक्ष लागून राहिलं आहे. 

 
 
 
 

A post shared by Naya Rivera (@nayarivera) on

 

दरम्यान, ७ जुलै रोजी नायानं अखेरची सोशल मीडिया पोस्ट केली होती. मुलासोबतचा फोटो पोस्ट करत, 'फक्त आम्ही दोघं....' असं कॅप्शन तिनं या फोटोला दिलं होतं.