'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेच्या 'त्या' सीन नंतर व्हायरल होतायेत मीम्स

'येऊ कशी तशी मी नांदायला' ही मालिका अवघ्या काही दिवसांतच प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे

Updated: Mar 24, 2021, 02:48 PM IST
'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेच्या 'त्या' सीन नंतर व्हायरल होतायेत मीम्स title=

मुंबई : सोशल मीडियावर चर्चो असते ती मालिकांची, प्रेक्षकांच्या प्रेमामुळे मालिका घराघरांत पोहोचतात. सोशल मीडियावर व्हायरल होणारे फोटो, व्हिडीओ, मीम्स हे प्रेक्षक सोशल मीडियावर शेअर करत असतात.. सध्या सोशल मीडियावर असेच काही मिम्स व्हायरल होत आहेत

सासूसुनेचा तोच तोच ड्रामा टीव्ही चॅनल्सनी आपला मोर्चा दैनंदिन विषयांकडे वळवला आहे. आजूबाजूच्या वास्तव आयुष्यात घडणाऱ्या अशा विषयांच्या काही नवीन मालिका नुकत्याच सुरू झाल्या आहेत. तर काही सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांचं चित्रण मालिकांमधून पाहायला मिळत असल्याने प्रेक्षकही अशा मालिकांबरोबर स्वत:ला रिलेट करताना दिसतात.

'येऊ कशी तशी मी नांदायला' ही मालिका अवघ्या काही दिवसांतच प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. काही दिवसांपूर्वी प्रसारीत झालेल्या भागात स्वीटू एका ट्रेनमध्ये बसते आणि यावेळी प्रवासादरम्यान ती झोपी जाते.

काही वेळाने तिला जाग येते मात्र तेव्हा या ट्रेनमध्ये ती एकटीच असते. स्विटूला अंबरनाथला उतरायच असत. मात्र गाढ झोपल्याने ती थेट कारशेडमध्ये पोहचते. या मालिकेमुळे अंबरनाथची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार सुरु झाली आहे. हा एपिसोड प्रसारित झाल्यानंतर स्विटूवर भरपूर मीम्स व्हायरल होत आहेत.

'मुंबई पुणे मुंबई' प्रमाणे 'मुंबई अंबरनाथ मुंबई', 'स्विटू उठ अंबरनाथ आलं' असे अनेक गंमतीशीर मीम तयार करण्यात आला आहे ज्याचा सोशल मीडियावर सध्या बोलबाला आहेयेऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेतील ओमकार आणि स्वीटू यांची केमेस्ट्रीसुद्धा चाहत्यांना आवडू लागली आहे. गरीब घरातील स्विटू आणि श्रीमंत घरातील ओमकार यांची प्रेमकहाणी हळूहळू सुरु झाली आहे.