''तूम्ही माझं करिअर हिरावून घेऊ शकता पण...", का झाली हेमांगी कवीची 'ही' पोस्ट व्हायरल?

सध्या मराठीतही असे अनेक सेलिब्रेटी आहेत ज्यांनी सोशल मीडियावर नुसता धुमाकूळ घातला आहे.

Updated: Jul 14, 2022, 06:44 PM IST
''तूम्ही माझं करिअर हिरावून घेऊ शकता पण...", का झाली हेमांगी कवीची 'ही' पोस्ट व्हायरल? title=

मुंबईः सध्या आपल्या फेसबुक तसेच इन्टाग्रामवरील व्हायरल पोस्टमुळे अनेक सेलिब्रेटी चर्चेत असतात. अशा अनेक वादग्रस्त पोस्ट येतात आणि जातात सोबतच त्यांची आठवणही कोणाला राहत नाही पण यावेळी मात्र असे झालेले नाही. सध्या मराठीतही असे अनेक सेलिब्रेटी आहेत ज्यांनी सोशल मीडियावर नुसता धुमाकूळ घातला आहे.

सध्या आपल्या अभिनयासोबतच सोशल मीडियावरील पोस्टमुळे अभिनेत्री हेमांगी कवी भलतीच चर्चेत राहते. बरोबर एक वर्षांपुर्वी तिने 'बाई, बुब्स आणि ब्रा' अशी पोस्ट व्हायरल केली होती ज्याला चांगल्या आणि वाईट दोन्ही कमेंट्स आल्या होत्या. काहींनी ती पोस्ट इतकी उचलून धरली की शेवटी ती पोस्टही अनेकांनी व्हायरल केली. त्यांनी ती पोस्ट रिलेटसुद्धा झाली. तेव्हा आता या वर्षपुरतीच्या निमित्ताने हेमांगीने अजून एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. 

हेमांगी कवीचा 'तमाशा लाईव्ह' हा चित्रपट उद्या रिलिज होतो आहे तेव्हा त्यानिमित्ताने आपल्या आयुष्यातील 'तमाशा लाईव्ह' किस्सा हेमांगीने पोस्ट केला आहे जो प्रचंड व्हायरल झाला आहे. त्या पोस्टमध्ये हेमांगी म्हणते की, ''माझ्या खूप viral झालेल्या 'बाई, बुब्स आणि ब्रा' post ला आज वर्ष पूर्ण होतंय. And I am very proud of it. काही लोकं आजही त्याची खिल्ली उडवत मला Tag करतायेत. परंतु एवढे सगळे होऊनही दिग्दर्शक संजय जाधव यांनी मला 'तमाशा लाईव्ह' फिल्मसाठी घेतले आणि आता तो सिनेमा रिलिज होत आहे."

हेमांगीने ती पोस्ट शेअर केल्यानंतर तिला अनेक हितचिंतकांचे कॉल्स आले पण त्याचसोबतच भीती दाखवणारेही आले त्यावर हेमांगी म्हणाली,  ''आता तुझं career धोक्यात येणार, तुला कुणीही काम देणार नाही, तूझी image आता दूषित झाली, प्रेक्षक तुला कधीच स्वीकारणार नाहीत वगैरे वगैरे! मला त्यांना एवढंच सांगायचंय प्रेक्षक म्हणून तुम्ही माझं career हिरावून घेऊ शकता माझं जगणं नाही!  मी त्यांच्या या बोलण्यामुळे घाबरले नाही पण वाईट नक्कीच वाटलं होतं," असं हेमांगीने सांगितले.