Hemagi Kavi Post on Nitin Chandrakant Desai: नितीन चंद्रकांत देसाई यांच्या आकस्मिक निधनात संपुर्ण हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. मराठी चित्रपट मालिका तसेच हिंदी चित्रपट आणि मलिकांमधून त्यांनी केलेले कलादिग्दर्शन हे प्रत्येकाच्याच लक्षात राहण्यासारखे आहे. त्यांच्या कलादिग्दर्शनानं आपल्या सर्वांनाच वेगळ्या रूपानं चित्रपटातील भव्य नजरा पाहायला मिळालेला आहे. त्यामुळे त्यांच्या जादूची आपल्यालाही वेगळी भव्यता पाहायला मिळाली आहे. परंतु त्यांच्या निधनानं मात्र त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. सिनेसृष्टीतील सर्व कलाकारांनी त्यांना श्रद्धाजंली वाहिली आहे. यावेळी हेमांगी कवी हिची पोस्टही चर्चेत आली आहे. हेमांगी हवी हिनं नितीन चंद्रकांत देसाई यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे यावेळी तिनं त्यांच्याबद्दलची एक आठवण शेअर केली असून एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. चाहत्यांनी हेमांगीच्या या पोस्टवर नाना तऱ्हेच्या कमेंट्स केल्या आहेत. त्यामुळे तिची ही पोस्ट सर्वत्र व्हायरल झाली आहे.
नितीन चंद्रकांत देसाई यांच्या कला दिग्दर्शनाचे सर्वच जण फॅन्स होते. त्यामुळे त्यांच्या कलेचे कोणी फॅन्स नसेल तरच नवल. 'जोधा अकबर', 'लगान', 'बालगंधर्व', '1942 - अ लव्ह स्टोरी', 'हम दिल दे चुके सनम', 'पानिपत' अशा अनेक लोकप्रिय चित्रपटांचे त्यांनी कला दिग्दर्शन केले होेते त्यातून त्यांच्या चित्रपटांनी प्रेक्षकांना एक वेगळा लुकही दिला आहे. त्यांच्यावर अनेक कोटींचे कर्ज होेते. ते आर्थिक विवंचनेत होते. अशी प्राथमिक माहितीसमोर आली आहे. त्यांनी काल पहाटे त्यांच्या कर्जतच्या ND Studio येथे गळफास लावून आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा - हृतिकच्या नव्या गर्लफ्रेंडवर जळतेय त्याची पहिली पत्नी; नेटकरी म्हणाले, 'जळूबाई...'
यावेळी हेमांगी कवी हिनं लिहिलंय की, ''जेव्हा इतक्या मोठ्या नावाच्या माणसाचा अंत असा होतो तेव्हा मनात प्रश्नांचं काहूर माजतं. मन उत्तरं शोधू लागतं. ती मिळत नाहीतच. मग आपण जरतरच्या गोष्टी बोलू लागतो. काही बाही धंडाळू लागतो. काय ते कळत ही नाही! पोटात खड्डा पडला बातमी ऐकून! मनात, अंगात थरथर आहे. आत खोलवर धडधडतंय आताही हे लिहीताना! नितीन सर! तुम्ही आदर्श, उदाहरण होतात आमच्या सारख्या लोकांसाठी! स्वप्न मोठी कशी बघायची ती सत्यात कशी उतरवायची याचं! भव्यदिव्यतेचं प्रतिक होतात! ‘होतात’ हा शब्द लिहावा लागतोय आज! छे! 2016 मध्ये माझा दादा Fortis hospital मध्ये admit होता!''
''समोरच्या Bed वर तुम्ही होतात. तेव्हा मी तुम्हांला पहील्यांदा भेटले होते. माझा दादाचं नाव नितीन, वडलांचं नाव चंद्रकांत. हे जेव्हा मी तुम्हांला सांगितलं तेव्हा म्हणाला होतात “अरे, म्हणजे देसाई आणि कवी चाच काय तो फरक! बघा हं, दोघांची औषधं, उपचार इकडे तिकडे व्हायची.” हे ऐकून Dr आणि Nurses सकट आम्ही हसलो होतो. आज पटकन तेच आठवलं! प्रत्येक माणूस जाणारच आहे हे आपल्याला सगळ्यांना माहितीए पण जेव्हा इतका यशस्वी, हिंदी सिनेमा, मालिका वरर्तूळात नाव कमवलेला, ते नाव टिकवून ठेवलेला मराठी माणूस आपलं आयुष्य असं संपवतो तेव्हा आमच्या सारख्या छोट्या लोकांचा confidence हलतो! Blank व्हायलं होतं! असा निर्णय घेताना तुमचं काय झालं असेल याचा किंचितसा अंदाज ही कुणी लावू शकणार नाही. पण आता जिथे कुठे असाल तिथे शांत असाल. या materialistic जगाच्या सगळ्या गराड्यातून दूर, मुक्त!''
सध्या तिच्या या पोस्टनं सर्वांचेच लक्ष वेधले आहे.