हिरिये - 'रेस 3 चित्रपटातील पहिलं दमदार गाणं !

सलमान खानचा आगामी 'रेस 3' सिनेमा येत्या ईदला चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. 

Updated: May 18, 2018, 07:10 PM IST
हिरिये - 'रेस 3  चित्रपटातील पहिलं दमदार गाणं !  title=

 मुंबई : सलमान खानचा आगामी 'रेस 3' सिनेमा येत्या ईदला चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी 'रेस 3'चा ट्रेलर चाहत्यांच्या भेटीला आला त्यापाठोपाठ आता या सिनेमाचं पहिलं गाणं रिलिज करण्यात आलं आहे.  

 'हिरिए' चाहत्यांच्या भेटीला  

 'रेस 3' चित्रपटातील हिरिए हे गाणं नुकतचं रिलीज करण्यात आलं आहे. सलमान खान आणि जॅकलीन फर्नांडिस यांच्यावर चित्रित करण्यात आलेलं हे गाणं डिस्कोमधील आहे. 
 हिरिए या गाण्यामध्ये जॅकलीन पोल डान्स करताना दिसत आहे. सलमान खानही या गाण्यामध्ये खास अंदाजात थिरकताना दिसत आहे. रेमो डिसुझाने 'रेस 3' चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे.  

 

 मीत ब्रदर्सचं संगीत - 

 'रेस 3' चित्रपटामधील गाणी मीत ब्रदर्स यांनी केलेली आहेत. हिरिए हे गाणं पंजाबी गायक दीप मनी आणि नेहा भसीन यांनी गायली आहेत. यापूर्वी सलमान खान आणि जॅकलीन ही जोडी 'किक' चित्रपटामध्येही एकत्र दिसली होती. 'रेस 3'हा सिनेमा येत्या 15 जूनला रिलिज होणार आहे.