झी मराठीच्या जाऊ बाई गावात या नव्या रिऍलिटी शो ने लोकांमध्ये उत्सुकता आणि कुतहुलता निर्माण केली आहे. पहिल्या प्रोमो पासून ते स्पर्धकांचे नव नवे प्रोमो ह्या सर्वांमुळेच प्रेक्षकांमध्ये ही उत्सुकता निर्माण केली आहे. कधी ना पहिला असा एक रिऍलिटी शो त्यांच्या भेटीस येणार आहे ज्याची ते अतुरतेने वाट पाहत असतानाच 'जाऊ बाई गावातच' शीर्षक गीताचं टीझर झी मराठीने आपल्या सोशल मीडियावर शेअर केल आहे.
हार्दिक जोशीचा गावराण अंदाज ह्या टिझरमध्ये पाहायला मिळतोय. फक्त गाण्याच्या टीझरने इतकी खळबळ निर्माण केली आहे, तर काय होईल जेव्हा पूर्ण गाण्याचा विडिओ लोकांसमोर येईल. आता वाजणार अन गाजणार !! प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा आणि मनोरंजनाची रंगतदार आतिषबाजी करणारा नवीन रिऍलिटी शो ‘जाऊ बाई गावात' आपल्या भेटीस येत आहे ४ डिसेंबर पासून सोमवार ते शनिवार रात्री ९:३० वाजता फक्त मराठीवर.
'जाऊ बाई गावात' ह्या नव्या रिऍलिटी शोचा आज आणखी एक उत्सुकता वाढवणारा धमाकेदार प्रोमो प्रदर्शित झालाय ज्यात ‘हार्दिक जोशीने’ अजून दोन नवीन स्पर्धकांशी ओळख करून दिली आहे. या शोची पाचवी स्पर्धक आहे सुरेल संस्कारी ‘श्रेजा म्हात्रे’, मॉडेल आणि सोशल मीडियाची आहे ती राणी लिहू शकेल का ती गावात स्वतःची एक वेगळी कहाणी? सहावी स्पर्धक ‘मोनिशा आजगावकर’, फोटोग्राफी आणि सामाजिक कार्याची आहे हिला आवड. आपल्या कॅमेरामध्ये दुनियेला जी करते कैद. शहरातल्या सवयी गावात कश्या टिकणार ?
तर पहिले चार स्पर्धक आहेत श्रीमंत घरची नात जिला घाबरतात सर्व घरात नाव आहे तिचे ‘स्नेहा भोसले’जी आहे लेडी डॉन, तिच्या किक बॉक्सिंगचा आहे सगळीकडे बोलबाला. दुसरी स्पर्धक आहे पापा की परी ‘संस्कृती साळुंखे’ जिचा चॉईसच आहे महाग, क्लिनिकल सायकॉलॉजिच्या डिग्रीचा तिला आहे अभिमान, तिच्या समोर कोणी काहीही लपवू शकत नाही. तिसरी स्पर्धक आहे फॅशन दिवा ‘रसिका ढोबळे’ जिच्या फॅशन फिगरवर आहेत सर्व फिदा. चौथी स्पर्धक आहे प्लस साइझ मॉडेल ‘हेतल पाखरे’ जिचं व्यक्तिमत्व आहे वजनदार.
स्वताच्याच प्रेमात असलेल्या ह्या मुली गावाला त्यांच्या प्रेमात पडू शकणार का? ‘आता करणार तेव्हा कळणार'. हळू हळू तुमच्यासमोर उलगडतील आणखी एका पेक्षा एक व्यक्तिमत्वाचे स्पर्धक. प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा आणि मनोरंजनाची रंगतदार आतिषबाजी करणारा नवीन रिऍलिटी शो ‘जाऊ बाई गावात' आपल्या भेटीस येत आहे ४ डिसेंबर पासून सोमवार ते शनिवार रात्री ९:३० वाजता फक्त मराठीवर.