सासूला घाबरुन Sharmila Tagore यांनी उचललं मोठं पाऊल; एका रात्रीत...

क्रिकेटर मन्सूर अली खान पतौडीसोबत लग्न ठरल्यानंतर सासूला घाबरुन शर्मिला यांनी घेतलेला 'तो' निर्णय होता थक्क करणारा...   

Updated: Dec 8, 2022, 11:55 AM IST
सासूला घाबरुन Sharmila Tagore यांनी उचललं मोठं पाऊल; एका रात्रीत...  title=

Happy Birthday Sharmila Tagore : 'काश्मीर की कली' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत आपल्या स्मितहास्यानं अनेकांनाच घायाळ करणाऱ्या अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी कलाविश्वात आपलं वेगळं असं स्थान प्रस्थापित केलं. आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाचं निमित्त साधत त्यांच्या आयुष्यातील कीही खास गोष्टी जाणून घेवू. साचेबद्ध भूमिकांना शह देत हिंदी कलाविश्वात बोल्डनेसही तितक्याच शिताफीनं सादर करणाऱ्या या अभिनेत्रीनं 'ऍन इविनिंग इन पॅरिस' या चित्रपटात स्विमसूट लूकमध्ये कमालच केली. असं करणाऱ्या त्या पहिल्या अभिनेत्री ठरल्या होत्या. एक काळ असा होता जेव्हा अभिनेत्रीने बिकिनी घालणे फार वाईट मानले जात असे. (sharmila tagore age)

पण तेव्हा बिकिनीमध्ये फोटोशूट करणाऱ्या पहिल्या अभिनेत्री होत्या त्या म्हणजे शर्मिला टागोर.  'काश्मीर की कली', 'वक्त', 'आमने-सामने' यांसारख्या उत्कृष्ट सिनेमांमध्ये अविस्मरणीय अभिनय करत प्रेक्षकांच्या मनात वेगळा ठसा उमटवला. (sharmila tagore son)

ती व्यक्ती मुंबईत येण्याआधी Sharmila Tagore च्या Bikini चे होर्डिंग्ज एका रात्रीत का हटवले

सासू येणार असल्यामुळे घेतला महत्त्वाचा निर्णय

'ऍन इविनिंग इन पॅरिस' या चित्रपटाच्या वेळचा एक अत्यंत रंजक किस्सा प्रेक्षकांचं आजही लक्ष वेधतो. त्यावेळी शर्मिला (Sharmila Tagore) आणि मंसूर अली खान पटौदी (Mansoor Ali Khan Pataudi ) हे रिलेशनशिपमध्ये होते. तेव्हाच मंसूर यांची आई, शर्मिला यांना भेटण्यासाठी मुंबईला येणार होत्या. 

तेव्हा मुंबईत सर्वत्र स्विमसूटमधील शर्मिला टागोर यांचे फोटो लावले होते. आता मंसूर यांची आई मुंबईत येणार असल्याचं ऐकत शर्मिलांना धडकीच भरली. त्यांनी चित्रपटाच्या निर्मात्यांशी तातडीनं संपर्क साधत चित्रपटाचे पोस्टर्स शहराच्या प्रत्येक ठिकाणहून हटवले. (sharmila tagore husband)

बंगाली होत्या शर्मिला
शर्मिला बंगाली होत्या (sharmila tagore father), मात्र मन्सूरसोबत लग्न करण्यासाठी आपला धर्म बदलण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यांनी आपलं नाव आयशा सुलताना ठेवलं. लग्नानंतर 42 वर्षे एकत्र राहिल्यानंतर टायगर यांचा मृत्यू झाला. 22 सप्टेंबर 2011 रोजी मन्सूर यांचा मृत्यू झाला.