'हामिद' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

सिनेमात एक सीआरपीएफ जवान आणि आठ वर्षाच्या लहान मुलाची कथा मंडण्यात आली आहे. 

Updated: Mar 6, 2019, 06:37 PM IST
'हामिद' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित title=

मुंबई : काश्मीर हा देशाचा मुख्य भाग त्याचबरोबर एक वाद ग्रस्त मुद्द सुद्धा आहे. या गंभीर मुद्द्यावर आधरित अनेक सिनेमे तयार होत आहे. दिग्दर्शक ऐजाज खान यांनी या गंभीर विषयावर 'हमिद' नावाचा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. सिनेमात एक सीआरपीएफ जवान आणि आठ वर्षाच्या लहान मुलाची कथा मंडण्यात आली आहे. 15 मार्च रोजी हा सिनेमा सिनेमागृहात दाखल होणार आहे. आधी हा सिनेमा 1 मार्च रोजी प्रदर्शित करण्यात येणार होता. पण पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशात संतापाची लाट उसळली होती. म्हणून हा सिनेमा 1 मार्च रोजी प्रदर्शित करण्यात आला नाही.

दिग्दर्शक ऐजाज खानयांना विचारण्यात आलेल्या प्रश्नांची देत ते म्हणाले, 'देश दुख: आणि अशांतीच्या मार्गवर होता. आम्ही आमच्या देशा सोबत होतो. 'हामिद' हा सिनेमा शांती,प्रेम आणि एकमेकांच्या भवना समजण्याच्या विचारांवर आधरलेला आहे.' ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी खुद्द त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित केला.

सिनेमातील आठ वर्षाच्या मुलाला एक नंबर मिळतो आणि तो त्या नंबरवर फोन करतो. फोन एका भारतीय जवानाला लागतो. त्यानंतर हामिद जवानाला तुम्ही अल्ला आहात का असा प्रश्न विचारतो. जवान त्या लहान मुलाच्या प्रश्नाला उत्तर देत हा मी अल्ला आहे असे म्हणतो. त्यानंतर त्यांच्यात निर्माण झालेल्या गोड नात्याचे दर्शन या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.