'टोटल धमाल' सिनेमानंतर अर्शद दिसणार 'या' सिनेमात

'टोटल धमाल' सिनेमा बॉक्स ऑफिसरवर 1.25 कोटींच्या घरात पोहोचला होता. 

Updated: Mar 6, 2019, 04:43 PM IST
'टोटल धमाल' सिनेमानंतर अर्शद दिसणार 'या' सिनेमात title=

मुंबई : 'टोटल धमाल' सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांचे मनोरंजन करणारा अभिनेता अर्शद वारसी पुन्हा चाहत्यांना खळखळून हसवण्यास सज्ज झाला आहे. टोटल धमाल नंतर अर्शद 'पागलपंती' सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांना पोट धरून हसवण्यास भाग पाडणार आहे. तगडी स्टरकास्ट असलेला 'टोटल धमाल' सिनेमा बॉक्स ऑफिसरवर 1.25 कोटींच्या घरात पोहोचला होता. 

अभिनेता अर्शत वारसी सध्या त्याच्या 'पागलपंती' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. 'पागलपंती' सिनेमात उर्वशी रौतेला, जॉन अब्राहम, इलियाना डीक्रूझ, अनिल कपूर यांच्या सोबत अन्य स्टार ही सिनेमात झळकणार आहेत. अर्शदने स्वत:च्या ट्विटर अकाउंटवरुन एक फोटो शेअर केला आहे. या फोटो मध्ये तो म्हणतो, 'मी पागलपंती सिनेमाच्या शूटिंग मध्ये खूप मज्जा करत आहे.' त्याबरोबर त्याने सिनेमाच्या सह कलाकारांचे आभार मानले आहेत.

मागील आठवड्यात 'टोटल धमाल' सिनेमाला टक्कर देणाऱ्यासाठी अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री कृती सेनन स्टारर सिनेमा 'लुका छुपी' सज्ज झाला. या दोन्ही सिनेमांच्या टफफाईट मध्ये 'लुका छुपी' सिनेमाने बाजी मारली आहे. सिनेमाच्या प्रदर्शनाच्या साहव्या दिवसापर्यंत 40 कोटींचा गल्ला जमा केला आहे.