मुंबई : स्टार्सचे बालपणीचे फोटो सोशल मीडियावर दररोज व्हायरल होतात. अनेक फोटोंमध्ये स्टार्सना ओळखणं अजिबात सोप्प नसतं. तर अनेक फोटोंमध्ये चाहते त्यांना ओळखण्यासाठी धडपडत असतात. अशाच एका बॉलिवूड सुंदरीचा बालपणीचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये या गोंडस मुलीने पांढऱ्या रंगाचा टॉप घातला आहे. तर केसांची पोनी तिने टाय केली आहे. आणि तिच्या चेहऱ्यावर निरागस हास्य आहे. कॅमेराकडे पाहताना या मुलीला ओळखण्यासाठी अनेकांची धडपड सुरू होती. ओळखू शकाल का हा कोणत्या अभिनेत्रीचा बालपणीचा फोटो आहे?
कोण आहे ही निरागस मुलगी?
या फोटोत दिसणारी ही निरागस मुलगी आज बॉलिवूडची टॉप हिरोईन आहे. ए ग्रेड अभिनेत्रींच्या यादीत तिचे नाव समाविष्ट असून तिने अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. तिचं संपूर्ण कुटुंबही अनेक वर्षांपासून चित्रपटांमध्ये सक्रिय आहे. या विवाहित सुंदरीला दोन मुलं असून तिचा नवराही बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आहे. फोटोत दिसणारी ही निरागस बॉलिवूडची टॉपची हिरोईन आहे
जर तुम्ही या अभिनेत्रीला ओळखलं नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की, ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून, करीना कपूर खान आहे. याचबरोबर करिना करिश्माची लहान बहीण आहे. करिश्मा कपूरने सैफ अली खानसोबत अनेक चित्रपटांमध्ये आपलं अभिनय कौशल्य दाखवलं आहे.
'हम साथ साथ है' या चित्रपटातही करिश्मा आणि सैफची लव्हस्टोरी दाखवण्यात आली असून शेवटी त्यांचं लग्नही दाखवण्यात आलं आहे. पण 2012 मध्ये करिनाने अभिनेता सैफसोबतही लग्न केलं, ज्याने तिच्या बहिणीसोबत ऑनस्क्रीन रोमान्स केला होता. करीना आणि सैफ लग्नाआधी बराच काळ एकमेकांना डेट करत होते. इतकंच नाही तर दोघंही अनेक चित्रपटांमध्येही दिसले. ज्यामध्ये 'ओमकारा' आणि 'कुर्बान'चा समावेश आहे. सध्या करीना आणि सैफला तैमुर आणि जेह अशी दोन मुलं आहेत.