Guess Who: फोटोतला 'हा' चिमुकला आज आहे बॉलिवूडचा टॉप अ‍ॅक्शन हिरो, तुम्ही ओळखलंत का?

John abraham Black and White Photo: सध्या सोशल मीडियावर सेलिब्रेटींच्या लहानपणाचे फोटोज हे व्हायरल होत असतात. अशाच एका बॉलिवूड सेलिब्रेटीचा (Bollywood Celebrity) फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा फोटो ब्लॅक एन्ड व्हाईट (Monochrome Photos) आहे. 

Updated: Mar 5, 2023, 09:47 PM IST
Guess Who: फोटोतला 'हा' चिमुकला आज आहे बॉलिवूडचा टॉप अ‍ॅक्शन हिरो, तुम्ही ओळखलंत का? title=
Guess Who john abraham childhood photo goes viral see the black and white photo

John abraham Childhood Photo: सोशल मीडियावर बॉलिवूड कलाकारांचे फोटोज (Celebrity Childhood Photos) हे व्हायरल होत असतात. त्यातील अनेक फोटो हे आपल्याला पटकन ओळखताही येत नाहीत. सध्या असाच एका लोकप्रिय अभिनेत्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या अभिनेता बॉलिवूडमध्ये एक्शन हिरो (Action Heros In Bollywood) म्हणून ओळखला जातो. त्याची ख्याती फक्त बॉलिवूड सिनेमापर्यंतच मर्यादित नाही तर जागतिक पातळीवरही आहे. सध्या या अभिनेत्याचा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. फोटोत तुम्ही पाहू शकता की एक लहान मुलगा गोड हसताना दिसतो आहे. हा फोटो ब्लॅक एन्ड व्हाईट आहे. (Guess Who john  abraham childhood photo goes viral see the black and white photo)

बॉलिवूडचे असे अनेक कलाकार आहेत जे बॉलिवूडशी काहीही संबंध नसताना चित्रपटसृष्टीत आले होते आणि त्यांनी चक्क काही दिवसांत मोठी मजल मारली आहे. मध्यंतरी नेपोटिझमच्या नावानं बॉलिवूडमध्ये रणकल्लोळ माजला होता. त्यातून सुशांत सिंग राजपूतच्या(Nepotism in Bollywood) केसनंतर तर तो अधिकच वाढत गेला. बाहेरून आलेल्या कलाकारांवर अन्याय होता त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात त्यावरून कलाकारांमध्ये वाद सुरू झाला होता. परंतु असे अनेक कलाकार आहेत जे बाहेरून आले असले तरी त्यांच्या कतृत्वानं ते खूपच लोकप्रिय ठरले आहेत. आम्ही ज्या कलाकराबद्दल बोलत आहोत. तोही असाच एक कलाका आहे ज्यानं बॉलिवूडशी (Bollywood) काहीही संबंध नसताना आपलं असं वेगळं स्थान हिंदी (Outsiders) सिनेसृष्टीत निर्माण केले आहे. 

सध्या व्हायरल होणाऱ्या फोटोत दिसणारा हा चिमुकला दुसरा तिसरा कोणी नसून तोे अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) आहे. जॉनला आपण कोण ओळखत नाही. त्याच्या चित्रपटांचे आपण मोठे चाहते आहेत. त्यानं बॉलिवूडशी काहीही संबंध नसताना आपल्या करिअरमध्ये चांगलं यश मिळवलं आहे. सध्या त्याचा हा फोटो त्याच्या चाहत्यांना आश्चर्यचकित करतो आहे. धूमसारख्या चित्रपटातून त्यानं फार कमी कालावधीमध्ये मोठं यश प्राप्त केले. यानंतर आलेले त्याचे असे अनेक हिट चित्रपट प्रेक्षकांच्या आजही आवडीचे आहेत. धुमनंतर (Dhoom Movie Series) त्याचे अनेक एक्शनपट गाजले. फक्त एक्शन चित्रपटच नाही तर त्यानं अनेक रॉमेण्टिक आणि सामजिक विषयांवरील चित्रपटांमधूनही कामं केली आहेत. सत्यमेव जयते (Satyamev Jayate) सारखा त्याचा चित्रपट खूप लोकप्रिय ठरला होता. 

जॉन अब्राहमचं वैयक्तिक आयुष्यही तितकेच चर्चेत आले होते. बिपाशा बासूशीसोबत रिलेशनशिपमध्ये (John Abraham and Bipasha Basu) असताना त्यांच्या अफेअरबद्दलही खूप चर्चा करण्यात आली होती.