गोविंदा या सिनेमातून करणार पूनरागमन

बॉलिवूड अभिनेता गोविंदाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, अभिनेता गोविंदा लवकरच सिनेमात पूनरागमन करणार आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Oct 2, 2017, 12:03 AM IST
गोविंदा या सिनेमातून करणार पूनरागमन title=
File Photo

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता गोविंदाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, अभिनेता गोविंदा लवकरच सिनेमात पूनरागमन करणार आहे.

काही दिवसांपूर्वी गोविंदाने 'आ गया हिरो' या सिनेमातून मोठ्या पडद्यावर एन्ट्री केली होती. त्यानंतर आता गोविंदा पून्हा एका नव्या सिनेमात झळकणार आहे. 'फ्राई-डे' या सिनेमाच्या माध्यमातून गोविंदा सिनेमात पहायला मिळणार आहे.

गोविंदा आपल्या कॉमेडीमुळे आणि अभिनयामुळे सर्वांना माहिती आहे. गोविंदाचा आगामी सिनेमा फुल एन्टरटेन्मेंट आणि कॉमेडी असल्याचं बोललं जात आहे.

बॉलिवूड लाईफ डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, डायरेक्टर अभिषेक डोगरा 'फ्राई-डे' या सिनेमाला डायरेक्ट करणार आहे. अभिषेक डोगरा यांनी यापूर्वी 'डॉली की डोली' सारख्या सिनेमाची निर्मिती केली आहे.

या सिनेमात गोविंदा सोबत वरुण शर्माही असणार आहे. वरुण शर्मा हा फुकरे सिनेमातून प्रेक्षकांसमोर आला होता. गोविंदाने या सिनेमासंदर्भात सांगितले की, या सिनेमाची एक धमाकेदार स्क्रिप्ट आहे. हा सिनेमा प्रेक्षकांची खूप मनोरंजन करणार आहे.