गोविंदा अखेर या अंकलच्या डान्सवर म्हणाला...

अभिनेता गोविंदाच्या गाण्यावर धमाल डान्स करणाऱ्या डब्बू अंकल, म्हणजेच संजीव श्रीवास्तव यांच्या डान्सवर अभिनेता गोविंदाने प्रतिक्रिया दिली आहे. 

Updated: Jun 15, 2018, 02:28 PM IST

मुंबई : अभिनेता गोविंदाच्या गाण्यावर धमाल डान्स करणाऱ्या डब्बू अंकल, म्हणजेच संजीव श्रीवास्तव यांच्या डान्सवर अभिनेता गोविंदाने प्रतिक्रिया दिली आहे. गोविंदा संजीव श्रीवास्तव यांच्या डान्सवर काय प्रतिक्रिया देईल याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं, अखेर गोविंदाने संजीव श्रीवास्तव यांच्या धमाल डान्सवर प्रतिक्रिया दिली आहे. एवढंच नाहीतर एका रिआलिटी शोमध्ये अभिनेता गोविंदा आणि संजीव श्रीवास्तव डान्स करणार आहेत. त्याआधी गोविंदाने संजीव श्रीवास्तव यांच्या डान्सविषयी बोलताना अतिशय छान प्रतिक्रिया दिली आहे. ( या ५ गोष्टी खाली वाचा)

गोविंदाने सांगितल्या अंकलच्या डान्सविषयी ५ गोष्टी (डान्सचा व्हिडीओ सर्वात खाली पाहा)

१) अभिनेता गोविंदा एका टीव्ही चॅनलशी बोलताना म्हणाला, "मला संजीव यांचा डान्स माझ्या पत्नीने दाखवला आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला. आम्ही कलाकार लोक खूप मेहनत घेऊन, इमानदारीने डान्स करतो. कोरिओग्राफर आम्हाला असतो, पण संजीव यांनी माझ्या सारखा उभेउभ डान्स केला आहे.

२)आमच्याकलेला अनेक दिवसांनी अशा डान्सने उजाळा मिळाल्यानंतर मला आणखी खूप आनंद झाला आहे. लोक म्हणतात की, आपली पर्सनॅलिटीवर सर्व अवलंबून असतं, पण पाहा संजीव श्रीवास्तव यांचं पोट बाहेर आलं आहे. पण त्याचा कोणताही फरक त्यांच्या डान्सवर नाही. त्यांच्या डान्सच्या कलेपुढे सर्वच फिकं आहे."

३) सर्वात महत्वाचं म्हणजे, हा माणूस आपल्या डान्समध्ये रमलाय, आपल्याच जगात आहे, तो किती सर्वोत्कृष्ट करतोय, हेच त्याला माहित नाहीय. पण तो बेस्ट करतोय, त्यांची पत्नी बाजूला डान्स करून साथ देतेय, एका खास प्रकारच्या यूपी टाईप डान्सचे ठुमके ती लगावतेय, ते पाहून तर मला आणखी आनंद झाला, खूपच छान वाटलं, मला असं अभिनेता गोविंदा म्हणत होता.

४) धमाल करतोय, मस्ती करतोय, तो डान्स करतोय, त्याचा तो विचार करत नाहीय. त्यात ती गोविंदा स्टाईल आतून जबरदस्त आहे. हा माणूस तर गोविंदाची कॉपी करतोय आणि खूपच चांगली कॉपी करतोय. आम्हाला जे गाणं शूट करण्यासाठी ९ तास लागले होते, ते फक्त ५ मिनिटात प्रोफेसर साहेबांनी बसवलं.

५) अंकला संदेश देताना, गोविंदाने सांगितलं, खूप चांगली कॉपी केली, मी खूप खूप धन्यवाद देतो, प्रोफेसर साहेब तुम्हाला, असाच डान्स करत राहा, ज्या प्रकारे तुम्ही डान्स करतायत, आपल्याच विश्वात आहात, ते मला खुप छानं वाटलं, मला खूप आनंद झाला. कृपया तुमच्या जीवनात धमाल करत राहा.

गोविंदाचा डान्स केल्यानंतर ते प्रसिद्धीला आले...