मुंबई : बॉलिवूडचा नंबर 1 हिरो म्हणजेच गोविंदा, जरी पूर्वीसारखा गोविंदा चित्रपटांमध्ये सक्रिय दिसला नाही. तरी त्याची लोकप्रियता अजूनही कमी झालेली नाही. राजकारण सोडल्यानंतर पुन्हा बॉलिवूडमध्ये परतलेला गोविंदा दुसऱ्यांदा फारसा यशस्वी झाला नाही. गोविंदा आता अॅड फिल्ममध्ये किंवा डान्स रिअॅलिटी शोमध्ये दिसतो. मात्र यामुळे गोविंदाच्या फिमध्ये फारसा फरक पडत नाही. चित्रपट न करता गोविंदा कोटीत कमाई करतो. आणि एक शानदार जीवन जगतो.
एका अहवालानुसार गोविंदाची एकूण मालमत्ता सुमारे 151 कोटी आहे. त्याच्याकडे मुंबई आणि आसपासचे 3 बंगले आहेत. गोविंदा आपल्या कुटुंबासोबत जुहूच्या बंगल्यात राहतो. असं म्हटलं जातं की, गोविंदा ब्रॉन्ड इंडोर्समेंट आणि रिअल इस्टेटमधून बरेच पैसे कमवतो. या अभिनेत्याकडे मर्सिडीज बेंझ सारख्या महागड्या गाड्यांचं कलेक्शन देखील आहे. यासह, तो दरवर्षी 16 कोटींपेक्षा अधिक उत्पन्न कमवतो.
गोविंदाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, गोविंदा अखेर 'रंगीला राजा' आणि 'आ गया हीरो' या चित्रपटांमध्ये दिसला होता. 1980च्या दशकात गोविंदाने अॅक्शन आणि डान्सिंग हीरो म्हणून करिअरची सुरुवात केली. 90च्या दशकात गोविंदाने स्वत:ची ओळख विनोदी नायक म्हणून निर्माण केली. 'इल्जाम', 'हत्या', 'जीते हैं शान से' आणि 'हम' या त्यांच्या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. 1992 सालच्या 'शोला और शबनम' या रोमँटिक चित्रपटात त्याने एनसीसी तरूण कॅडेटची भूमिका साकारली होती.