वयाच्या 48 व्या वर्षी अभिनेत्री मलायका अरोराने गुपचूप बांधली लग्नगाठ? फोटो आले समोर

. अभिनेत्री  मलायका अरोरा तिच्या सौंदर्या प्रमाणेच तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. अभिनेत्री तिच्या प्रोफेशन आयुष्याप्रमाणेच तिच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत असते. 

Updated: Apr 15, 2023, 10:02 PM IST
वयाच्या 48 व्या वर्षी अभिनेत्री मलायका अरोराने गुपचूप बांधली लग्नगाठ? फोटो आले समोर title=

मुंबई :  48 वर्षांची अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच चर्चेत असते. या वयातही अभिनेत्रीने स्वत:ला खूप फिट ठेवलं आहे. तिच्या समोर अनेक अभिनेत्री फिक्या पडतात. अभिनेत्री तिच्या सौंदर्या प्रमाणेच तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. अभिनेत्री तिच्या प्रोफेशन आयुष्याप्रमाणेच तिच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत असते. आधी घटस्फोट मग 12 वर्षांनी लहान असलेल्या अर्जुन कपूरला डेट करण्यामुळे चर्चेत आहे. अनेकदा या कपलच्या लग्नाच्याही अफवा उडाल्या आहेत. आता अशीच एक बातमी अभिनेत्री संबधित समोर येत आहे. 

कधी तिच्या बोल्डनेसमुळे तर कधी तिच्या स्पष्ट वक्तव्यामुळेही मलायका चर्चेत असते. मात्र आता अभिनेत्रीबाबत एक बातमी समोर येत आहे. जी ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. सध्या या अभिनेत्रीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात ती खूप सुंदर दिसत आहे. या व्हिडिओत ती एखाद्या नववधूच्या वेशात दिसत आहे. मलायकाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
 
मलायकाला नववधूच्या वेशात पाहून तिचे चाहते सध्या हैराण झाले आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अभिनेत्री लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. तिला असं पाहून अभिनेत्रीने अर्जुन कपूरसोबत गुपचूप लग्नगाठ बांधल्याचा चाहत्यांचा अंदाज आहे. मात्र व्हायरल होत असलेले हे फोटो तिचे आत्ताचे नाहीत. जरी तिचे हे फोटो आत्ता व्हायरल होत असले तरी तिचे हे फोटो जुने आहेत. अभिनेत्रीचे हे फोटो गेल्यावर्षीचे आहेत. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर चाहते तिला विचारत आहे की, तिने गुपचूप लग्न केले आहे का? 

व्हायरल होणारे हे फोटो तुर्कीमधील आहेत. जेव्हा ती आणि अर्जून कपूर वेकेशनला गेले होते. त्यावेळीही त्यांचे हे फोटो पाहून चाहत्यांनी अंदाज बांधला होता की, या जोडीने गुपचूप लग्नगाठ बांधली आहे. हे जोडी कधी लग्नबंधनात अडकतेय याकडे सगळ्यांचच लक्ष लागलं आहे. अनेकदा अभिनेत्रीला याबद्दल विचारंलही जातं. पण अभिनेत्री कधी लग्नबंधनात अडकणार हे तिने किंवा अर्जूनने स्पष्टीकरण दिलेलं नाही. अभिनेत्री मलायका अरोरा तुर्कियेमध्ये सुट्टीचा आनंद घेत होती.