'पद्मावती'चे 'घुमर' गाणं रसिकांंच्या भेटीला

संजय लीला भंसाळींच्या बहुप्रतिक्षित  सिनेमा 'पद्मावती' चित्रपटातील पहिलं गाणं आज रिलीज करण्यात आलं आहे. 

Updated: Oct 25, 2017, 03:54 PM IST
'पद्मावती'चे 'घुमर' गाणं रसिकांंच्या भेटीला  title=

मुंबई : संजय लीला भंसाळींच्या बहुप्रतिक्षित  सिनेमा 'पद्मावती' चित्रपटातील पहिलं गाणं आज रिलीज करण्यात आलं आहे. 

'घुमर' या गाण्यामध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोणचा खास अंदाज दाखवण्यात आला आहे.  युट्युबवर हे गाणं प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या एका तासामध्येच या गाण्याला सुमारे १ लाखाहून अधिक लोकांनी पाहिले आहे. 

 

घुमर  हा राजस्थानी पारंपारिक नृत्यप्रकार आहे. जो खास प्रसंगी केला जातो. पद्मावती चित्रपटातील दीपिकाचा राजेशाही थाट थक्क करणारा आहे. पद्मावती' या मुख्य भूमिकेत अभिनेत्री दीपिका पादुकोण दिसणार आहे. सोबत शाहीद कपूर आणि रणवीर सिंग प्रमुख भूमिकेत आहेत. 

पद्मावतीच्या ट्रेलरलादेखील रसिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता. १ डिसेंबरला हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षकांनी जसा चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद दिला तसाच करणी सेना, राजपुत संघटना यांनी पद्मावती चित्रपटाला विरोध  दर्शवला आहे. आम्ही चित्रपट पाहिल्याशिवाय प्रदर्शित झाल्यास सिनेमागृहांची नासधुस केली जाईल अशा स्वरूपाच्या धमक्यादेखील देण्यात आल्या आहेत.