बापरे! रितेश देशमुखची पत्नी स्वत:च्याच मुलाला ओळखेना

तिच्यासोबत नेमकं काय झाल?

Updated: Nov 2, 2021, 04:40 PM IST
बापरे! रितेश देशमुखची पत्नी स्वत:च्याच मुलाला ओळखेना title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : सहसा आई आणि मुलाचं नातं हे कायमच अव्यक्त असंच असतं. काही नाती शब्दांत मांडता येत नाहीत. हे नातं, त्यापैकीच एक. आईसाठी तिची मुलंच सर्वस्व असतात. पण, रितेश देशमुखच्या पत्नीच्या बाबतीत मात्र काही उलटंच घडताना दिसत आहे. कारण, ठरतोय सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक व्हिडीओ. 

ये हम है, असं सांगताना रितेशची पत्नी, genelia deshmukh तिच्या मुलाची ओळख करुन देताना मात्र गोंधळून जाते. गोंधळते म्हण्यापेक्षा हा मुलगा कोण, हेच ती विसरुन जाते. बस्स, अवघ्या काही सेकंदांचा हाच व्हिडीओ आता वाऱ्याच्या वेगानं व्हायरल होऊ लागला आहे. 

बापरे, genelia deshmukh असं काहीतरी कसं करु शकते, असे प्रश्नही हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी उपस्थित केला. काहींनी तर चिंताही व्यक्त केली. पण, तुम्हाला माहितीये का, हा व्हिडीओ निव्वळ मनोरंजनाच्याच उद्देशानं पोस्ट करण्यात आला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

खुद्द genelia deshmukh नंच इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. जिथे ती मुलासोबत दंगा करण्याच्या मूडमध्ये दिसत आहे. जेव्हा तुमच्या मुलाला वाटतं, आई विसरलीये पण.... असं कॅप्शनही तिने या व्हिडीओला दिलं आहे. 

काही क्षणांतच तिचा हा व्हिडीओ चर्चेत आला असून, त्यावर अनेकजण व्यक्तही होऊ लागले आहेत. मुख्य म्हणजे आता रितेश पत्नीचं हे रुप पाहून काय म्हणतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.