Genelia D'Souza : 'तुम्ही जर मला दुखवलं तर ते मी लक्षात ठेवेण..' असं काय झालं असेल जेनेलियासोबत

बॉलीवूड ते टॉलीवूडपर्यंत सगळ्यांनाच आपल्या अभिनयाने भूरळ पाडणारी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री जेनेलिया डिसूजा (Genelia D'Souza). 

Updated: Oct 2, 2022, 10:17 PM IST
Genelia D'Souza : 'तुम्ही जर मला दुखवलं तर ते मी लक्षात ठेवेण..' असं काय झालं असेल जेनेलियासोबत  title=
Genelia DSouza If you hurt me I will remember it nz

Bollywood Actress : बॉलीवूड ते टॉलीवूडपर्यंत सगळ्यांनाच आपल्या अभिनयाने भूरळ पाडणारी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री जेनेलिया डिसूजा (Genelia D'Souza). ही तिच्या नवनवीन रिल्समुळे (Reel) नेहमीच चर्चेत असते. जेनेलिया आणि रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) हे कॉमेडी रिल (Comedy Reel) तयार करुन चाहत्यांचे सोशल मीडियावर मनोरंजन (Entertainment) करत असतात. जेनेलिया सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय (Active) असते. (Genelia D'Souza If you hurt me I will remember it nz)

आणखी वाचा - ब्रेक-अप मधून बाहेर यायच्या जबरदस्त टिप्स... जाणून घ्या

जेनेलिया तिच्या आयुष्याला घेऊन काही स्पष्टवक्त करते. तिने एका मुलाखतीत (interview) इंटरव्हूयर ने दिलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाली होती की, 'जर मला कोणी दुखवलं तर ते मी लक्षात ठेवते'. आपण काही नात्यांमध्ये भावनिक गुंतवणूक (Emotional investment) केलेली असते मग अशा वेळेस मला कोणी दुखवल्यास ते मला आवडणार नाही. जेव्हा मला वाईट वाटते तेव्हा मला त्यातून बाहेर पडायला ही बराच वेळ लागतो असं ही तिनं त्या मुलाखतीत सांगितले.

आणखी वाचा - सेलिब्रिटी पीत असलेल्या काळ्या पाण्यामध्ये नक्की असतं तरी काय जाणून घ्या...

आपल्या प्रत्येकाचा एक स्वभाव असतो. काहीजणांना एखाद्या प्रसगांतून बाहेर पडायला फारसा वेळ लागत नाही तर काहीजणांच्या मनात तो प्रसंग कायम घर करुन जातो. सध्या जेनेलिया चित्रपटांमध्ये (movies) फारशी सक्रिय नाही पण लवकरच चित्रपटांमध्ये दिसेल अशी आशा तिच्या चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे. जरी ती  चित्रपटांमध्ये सक्रिय नसली तरी ती सोशल मीडियावर (Social media) नवनवीन रिल्स घेऊन येत असते. चाहत्यांचे (fans) मनोरंजन करण्यात ती कुठेही कमी पडत नाही.