रितेश आणि प्रितीची जवळीक पाहूण भडकली जेनेलिया; केलं असं काही की....

रितेश आणि प्रितीची जवळीक पाहूण जेनेलियाने पती रितेशची चांगलीचं हजेरी घेतली.   

Updated: Mar 20, 2021, 09:24 AM IST
रितेश आणि प्रितीची जवळीक पाहूण भडकली जेनेलिया; केलं असं काही की.... title=

मुंबई : अभिनेता  रितेश देशखमुख आणि पत्नी जेनेलिया देशमुख हे क्युट कपल कायम सोशल मीडियावर चर्चेत असतं. शिवाय रितेश आणि जेनेलिया कायम त्यांच्या चाहत्यांना कपल गोल्स देत असतात. शिवाय सोशल मीडियावर त्यांचे फोटो आणि व्हिडिओ देखील तुफान  व्हायरल होत असतात. आता देखील त्यांचा एक खास व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जेनेलिया, रितेशवर चांगलीचं भडकली आहे. 

सध्या रितेश, जेनेलिया आणि अभिनेत्री प्रिती झिंटा यांचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये रितेश आणि प्रिती गप्पा मारताना दिसत आहेत. रितेश आणि प्रितीच्या गप्पा इतक्या रंगल्या आणि तोच रितेशला प्रितीसोबत बघताच जेनेलियाचा पारा तापला.  त्यानंतर रितेशने प्रितीच्या हाताल किस तेव्हा तर जेनेलियाच्या चेहऱ्यावरचे भाव तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता...

या व्हिडिला एक आणखी भाग जोडण्यात आला आहे. यामध्ये जेनेलिया रितेशची हजेरी घेताना दिसत आहे. तेव्हा रितेश हात जोडून म्हणतो 'तेरा नाम लिया, तुझे याद किया...'  रितेश आणि जेनेलियाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सांगायचं झालं तर हा व्हिडिओ 2019 मधील अवॉर्ड शोचा आहे.