विमानतळावर जेव्हा दीपिकाला पासपोर्ट विचारला जातो...

मुंबई विमान तळावर एका सुरक्षारक्षकाने दीपिकाकडे पासपोर्टची मागणी केली.

Updated: Jun 23, 2019, 08:05 AM IST
विमानतळावर जेव्हा दीपिकाला पासपोर्ट विचारला जातो... title=

मुंबई : विमानतळावर सुरक्षारक्षक प्रत्येक प्रवाशाकडे पासपोर्टसाठी विचारत आपले कर्तव्य बजावत असतात. असाच प्रश्न प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोनला विचारण्यात आहे. मुंबई विमान तळावर एका सुरक्षारक्षकाने दीपिकाकडे पासपोर्टची मागणी केली. त्यानंतर लगेचच दीपिकाने आपल्या बॅगेतून पासपोर्ट काढत सुरक्षारक्षकाला दाखवला. सध्या दीपिकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तर नेटऱ्यांकडून तिच्या सकारात्मक वृत्तीचे कौतुक होत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Thy shall always obey rules deepikapadukone

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

इन्स्टाग्रामवर दीपिकाचा हा व्हिडीओ चांगलाच जोर धरत आहे. मेघना गुलजार दिग्दर्शित 'छपाक' चित्रपटाचे चित्रीकरण तिने नुकतेच पूर्ण केले आहे. चित्रपटात दीपिकासह अभिनेता विक्रांत मेसीसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. चित्रपट १० जानेवारी रोजी रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. 

'छपाक' चित्रपटामध्ये आव्हानात्मक भूमिका साकारल्यानंतर दीपिका '८३' चित्रपटात अभिनेता रणवीर सिंगच्या पत्नीच्या भूमिकेत झळकणार आहे. '८३' चित्रपट १० एप्रिल २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे. लग्नानंतर दीपिका आणि रणवीर पहिल्यांदाच एकत्र मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत.