''गंगुबाई काठियावाडी' सिनेमामुळे आमच्या कुटुंबाची बदनामी होत आहे'

'गंगुबाई  काठियावाडी' यांच्या दत्तक मुलाने कुटुंबाची  बदनामी होत असल्याचा  दावा केला . 

Updated: Mar 26, 2021, 08:59 AM IST
 ''गंगुबाई  काठियावाडी' सिनेमामुळे आमच्या कुटुंबाची  बदनामी होत आहे' title=

मुंबई : सध्या  अभिनेत्री आलिया भट्टचा आगामी 'गंगुबाई  काठियावाडी'  सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकत आहे.  सतत विरोध होत असलेल्या सिनेमाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, आलिया भट्ट आणि लेखक यांना माझगाव न्यायालयाने समन्स बजावत 21 मे रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगितलं आहे. संबंधीत याचिका  गंगुबाई काठियावाडी यांच्या दत्तक मुलाने केली. 
 
'गंगुबाई काठियावाडी' सिनेमामुळे आमच्या कुटुंबाची बदनामी होत आहे. असा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे. याचिकाकर्त्याचं नाव बाबू रावजी शाह असं आहे. गंगुबाई यांनी दत्तक घेतलेल्या चार मुलांपैकी एक असल्याचा दावा बाबू रावजी शाहने केला आहे. सध्या या सिनेमाच्या चर्चा सर्वत्र वाऱ्यासारख्या पसरत आहेत.

'माफिया क्‍वीन्‍स ऑफ मुंबई' पुस्तकात लिहिलेली माहिती  खोटी आहे. त्यात काही तत्थ नाही. संजय लीला भन्साळींनी चूकीच्या माहितीच्या आधारावर सिनेमाची निर्मिती  केली आहे. त्यामुळे बाबू रावजी शाहने पुस्तकाचे लेखकांच्या विरोधात मानहानीचा दावा केला आहे. त्याने सिनेमाच्या टीझर आणि ट्रेलरवर बंदी आणण्याची मागणी केली होती. 

पण न्यायालयाने त्याची मागणी फेटाळली. 'माफिया क्‍वीन्‍स ऑफ मुंबई' हे पुस्तक 2011 साली प्रदर्शित करण्यात आलं होतं आणि तक्रार आता दाखल करतायं असं म्हणतं न्यायालयाने बाबू रावजी शाहची याचिका फेटाळली.  'गंगुबाई काठियावाडी’ हा सिनेमा हुसैन जैदी यांच्या‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकावर आधारीत आहे.