Ganeshotsav 2022 : करुन सवरुन भागला... तोंड लपवतच गणरायाला घरी नेण्यासाठी आला Shilpa shetty चा पती

पाहा Video, गणपती बाप्पाची मूर्ती नेण्यासाठी कसा आला राज कुंद्रा 

Updated: Aug 29, 2022, 02:29 PM IST
Ganeshotsav 2022 : करुन सवरुन भागला... तोंड लपवतच गणरायाला घरी नेण्यासाठी आला Shilpa shetty चा पती title=
Ganeshotsav 2022 Bollywood Actress shilpa shetty husbannd raj kundra at ganpati agaman

Ganeshotsav 2022 : गणेश चतुर्थी अर्थात घरोघरी, गल्लीबोळातल्या मंडळांमध्ये गणपती बाप्पा विराजमान होण्यासाठी आता अवघे काही तास उरले आहेत. दोन वर्षे असणारं कोविडचं सावट आणि त्यानंतर निर्बंधांमध्ये आलेली शिथिलता, या साऱ्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी गणेशोत्सव दणक्यात साजरा होणार आहे. 

साधारण काही महिन्यांपासून प्रत्येकजण गणपती बाप्पाच्या आगमनाच्या तयारीला लागल्याचं दिसत आहे. सेलिब्रिटीही यात माहे नाहीत. यापूर्वी पडद्यामागून चालणारी सेलिब्रिटींची Ganeshotsav 2022 साठी सुरु असणारी तयारी आता संपूर्ण जगासमोर आली आहे. 

देवा गणराया, सगळी संकटं दूर ने बाबा... असं हक्कानं सांगत सर्वसामान्यच नव्हे तर बरेच सेलिब्रिटीही या उत्साहात न्हाऊन निघाले आहेत. अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिच्या कुटुंबाचाही यात समावेश आहे. 

Porn Films प्रकरणी शिल्पाचा पती, राज कुंद्रा (Shilpa shetty raj kundra welcomes lord ganesha) याच्यावर लावण्यात आलेले गंभीर आरोप असो किंवा मग त्यानंतर शिल्पालाही सहन करावा लागलेला मनस्ताप असो. या सेलिब्रिटी जोडीनं वाईटातले वाईट दिवसही पाहिले. 

मुद्दा असा, की त्यातूनही पुढे येत त्यांनी विश्वासानं हे नातं टिकवून ठेवलं. संकटं दूर होत असल्याचं चित्र पाहायला मिळत असतानाच शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा गणरायाच्या आगमनासाठी सज्जही झाले आहेत. 

नुकतंच राज कुंद्रा यानं गणपतीची मूर्ती घरी आणण्यासाठी गणेश चित्रशाखा गाठली. इथंही तो नेहमीप्रमाणेच तोंड लपवून आला. देवापुढे नतमस्तक होत त्यानं आपल्यावर कृपा ठेवण्यासाठी या ईष्ठदेवतेकडे प्रार्थना केली. 

नेटकऱ्यांना मात्र राज कोणत्याही रुपात समोर आला, तरी ते खपत नसल्याचंच स्पष्ट होताना दिसत आहे. 'बघा.. बाप्पालाही अशा लोकांच्या घरी जावं लागतंय... बाप्पालाही तोंड दाखवायची यांची...मूर्ख', 'अती भक्ती, चोरांचं लक्षण' अशा कमेंट करत नेटकऱ्यांनी राज कुंद्रावर संताप व्यक्त केला. मुख्य बाब अशी, की अनेकांनाच आता त्याला विनामास्क पाहण्याचीही इच्छा आहे, त्यामुळं गणेशोत्सवाच्या रुपात तरी राज कुंद्रा त्याचा चेहरा जगासमोर आणणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.