गालिब यांच्या नावाला फक्त भारतातच महत्व-जावेद अख्तर

त्यांचे काम त्यांची भाषा आणि त्यांच्या विचारांची समज हे केवळ भारतातच शक्य झाले 

Updated: Jan 30, 2019, 07:13 PM IST
गालिब यांच्या नावाला फक्त भारतातच महत्व-जावेद अख्तर  title=

मुंबई: दिग्गज गीतकार-पटकथा लेखक जावेद अख्तर यांचे म्हणणे आहे की दिग्गज उर्दू कवि मिर्जा गालिब यांच्या नावाला फक्त भारतातच महत्व मिळू शकते. जर त्यांच्या नावला भारतात प्रसिद्धी मिळाली नसती तर त्यांचा विकासही झाला नसता आणि ते सुरक्षितही राहू शकले नसते. त्यांचे काम त्यांची भाषा आणि त्यांच्या विचारांची समज हे केवळ भारतातच शक्य झाले 
गालिब यांच्या सांगण्यानुसार संतुलित धर्म म्हणजे एक सर्वोच्च शक्ती आहे. आपल्याला घडवणारा एक आहे आणि आपण फक्त त्याची रचना आहोत. नुकताच गालिब यांच्या भित्ति-चित्र  उद्धघाटनाच्या वेळेस अख्तर यांनी उर्दू कवि मिर्जा गालिब यांच्या बद्दल आपले मत मांडले.
गायक अख्तर यांनी गालिब यांचे कौतुक केले आहे. अख्तर यांनी सांगितले की गालिब यांना भावनांची समज अनन्यसाधारण आहे. त्यांचे म्हणणे आहे की तत्त्वज्ञानाबद्दलची सर्वात विलक्षण गोष्ट म्हणजे ती कधीही जुनी होत नाही. अन्य कविंच्या तुलनेत त्यांनी फार कमी कवीता रचल्या आहेत. आपल्या जीवनात काय परिस्थिती आहे हे महत्त्वाचे नाही परंतु त्यांच्या कवितांना आपल्या आयुष्याशी जोडणे आणि  त्यांच्या कवीता अनुभवता येणे फार महत्वाचे आहे.