'गजनी' बायडन यांचा डाटा प्रत्येक ५ मिनिटाला क्रॅश होतो - कंगना रानौत

कंगनाने ट्विटरच्या माध्यमातून बायडन यांना गजनी म्हणून संबोधलं आहे.    

Updated: Nov 8, 2020, 04:52 PM IST
'गजनी' बायडन यांचा डाटा प्रत्येक ५ मिनिटाला क्रॅश होतो - कंगना रानौत title=

मुंबई : अभिनेत्री कंगना रानौत नेहमी चालू विषयांवर आपलं परखड मत मांडत असेत. नेहमी वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या कंगनाने आता थेट अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यावर निशाणा साधला आहे. तिने बायडन यांचा उल्लेख 'गजनी' म्हणून केला आहे. ट्विटरच्या माध्यमातून तिने बायडन यांना गजनी म्हणून संबोधलं आहे. सध्या तिचं हे ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो बायडेन (Joe Biden) यांनी डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचा पराभव करत अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष ((American presidency) झाले आहेत. 

कंगना ट्विट करत म्हणाली की, 'गजनी बायडन यांच्याबद्दल मी आश्र्वस्त नाही. बायडन यांचा डाटा प्रत्येक ५ मिनिटाला क्रॅश होतो. इतक्या औषधांचे इंजेक्शन त्यांच्यात इंजेक्ट केले आहे की ते एक वर्षापेक्षा अधिक काळ टिकू शकत नाही.' असं ती म्हणाली. 

त्यामुळे, पुढील शो कमला हॅरीस पुढे नेतील, हे स्पष्ट आहे. जेव्हा एक महिला पुढे जाते तेव्हा तिच्यासोबत ती अन्य महिलांसाठी देखील मार्ग तयार करते. या ऐतिहासिक दिवसासाठी चिअर्स. दरम्यान डेमोक्रॅटीक पक्षाचे जो बायडन राष्ट्राध्यक्षपदापर्यंत पोहोचताच सर्वच स्तरातून त्यांच्यावर वर्षाव करण्यात आला. मात्र कंगना त्यांच्या विजयावर खूश नसल्याचं दिसत आहे. 

अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक (US election 2020 ) निकालाकडे सगळ्या जगाचे लक्ष लागले होते.  बायडेन यांना २८४ तर ट्रम्प यांना २१४ इतकी मते मिळाली. अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत बायडेन विक्रमी मतांनी विजयी झालेत. बायडेन यांना सात कोटींहून जास्त मते मिळाली आहेत. बायडेन यांच्या विजयामुळे अमेरिकेच्या उपराष्ट्रपतीपदी भारतीय वंशाच्या कमला हॅरीस यांची निवड झाली.