51 दिवसांनंतरही कमी झाली नाही ब्लॉकबस्टर 'गदर 2' ची क्रेझ; कलेक्शनचा आकडा पाहून बसेल धक्का

अनिल शर्मा दिग्दर्शित 'गदर 2' ने इतिहास रचला आहे. 11 ऑगस्ट रोजी रिलीज झालेल्या सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या चित्रपटाने आपल्या प्रचंड कमाईने सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे.

Updated: Oct 1, 2023, 04:31 PM IST
51 दिवसांनंतरही कमी झाली नाही ब्लॉकबस्टर 'गदर 2' ची क्रेझ;  कलेक्शनचा आकडा पाहून बसेल धक्का  title=

Gadar 2 Box Office : सनी देओलच्या 'गदर 2' ची कमाई बॉक्स ऑफिसवर कलेक्शन थांबण्याची कोणतीच चिन्ह दिसत नाहीयेत. अनिल शर्मा दिग्दर्शित 'गदर 2' ने इतिहास रचला आहे. 11 ऑगस्ट रोजी रिलीज झालेल्या सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या चित्रपटाने आपल्या प्रचंड कमाईने सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे.

बॉक्स ऑफिसवर थांबत नाहीये गदर 2 ची कमाई
आता हा चित्रपट प्रदर्शित होऊन दोन महिने पूर्ण करणार असून इतक्या दिवसांनंतरही तारा सिंगची क्रेझ प्रेक्षकांमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. 'गदर 2' च्या कमाईबद्दल बोलताना दैनिक जागरणने सॅकनिल्कच्या रिपोर्टचा हवाला देत सुरुवातीचे आकडे दिले आहेत, रिपोर्टनुसार, या सिनेमाने 51 व्या दिवशी 25 ते 30 लाख रुपयांची कमाई केली आहे. यासोबतच 'गदर 2'चे आतापर्यंतचे एकूण कलेक्शन 525 कोटींहून अधिक झालं आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की 'गदर 2' हा सनी देओलचा पहिला सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

'गदर २' 'पठाण'समोर टिकू शकला नाही.
शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सनी देओलच्या 'गदर 2' च्या कमाईवर मोठा परिणाम झाला आहे. 'जवान'च्या वादळात 'गदर 2' टिकू शकला नाही आणि चित्रपटाच्या कमाईत मोठी घसरण झाली. त्याच वेळी, 'फुकरे 3' आणि 'द वॅक्सीन वॉर' देखील 28 सप्टेंबर रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाले आहेत, ज्यामुळे आता गदर 2 च्या कमाईवर परिणाम होऊ शकतो.

'फुकरे 3' बद्दल बोलायचं झालं तर या चित्रपटाने तीन दिवसांत एकूण 27.93 कोटींची कमाई केली आहे. तर विवेक अग्निहोत्रीचा 'द वॅक्सीन वॉर' चित्रपट काही विशेष कमाई करू शकला नाही. या चित्रपटाने पहिल्या वीकेंडमध्ये केवळ 3.25 कोटींची कमाई केली आहे.