एकाच दिवशी धडकणार OMG 2 - Gadar 2; पण Advance Booking मध्ये कोणी मारली बाजी? पाहा

OMG 2 vs Gadar 2 Advance Booking: सध्याचा ऑगस्ट महिना हा खूपच खास आहे. या महिन्यात 11 ऑगस्टला OMG 2 आणि Gadar 2 हे दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे या चित्रपटांमध्ये जोरदार रणधुमाई पाहायला मिळते आहे. पाहा आगाऊ तिकिट विक्रीमध्ये नक्की कोण पुढे आहे? 

गायत्री हसबनीस | Updated: Aug 5, 2023, 05:46 PM IST
एकाच दिवशी धडकणार OMG 2 - Gadar 2; पण Advance Booking मध्ये कोणी मारली बाजी? पाहा title=
August 5, 2023 | Gadar 2 advance booking is more higher than omg 2 see the full details

OMG 2 vs Gadar 2 Advance Booking: सध्या चर्चा आहे ती म्हणजे याच महिन्यात एकाच दिवशी प्रदर्शित होणाऱ्या दोन मोठ्या चित्रपटांची. त्यातील एक चित्रपट म्हणजे अक्षय कुमारचा OMG 2 आणि दुसरा म्हणजे Gadar 2. या दोन चित्रपटांची गेल्या काही दिवसांपासून खूप मोठ्या प्रमाणात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. गेल्या वर्षभरापासून हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असल्याच्या चर्चा होत्या. शेवटी मागे पुढे होत होत हे चित्रपट अखेर 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहेत. तेव्हा तमाम बॉलिवूडच्या रसिक प्रेक्षकांना या दोन्ही चित्रपटांची आतुरता लागून राहिलेली आहे. या दोन्ही चित्रपटांचे एकामागून एक ट्रेलरही प्रदर्शित झालेले होते. त्यातून या दोन्ही चित्रपटांवर सेन्सॉर बोर्डानं आक्षेप घेतलेले आहेत. या चित्रपटातील अनेक दृश्ये आणि गाणी, संवाद यांच्यावर कात्री फिरवण्यात आलेली आहे. वर म्हटल्याप्रमाणे या दोन्ही चित्रपटांची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. त्यामुळे एडव्हान्स बुकींगमध्येही या चित्रपटांमध्ये जोरदार चर्चा पाहायला मिळते आहे. 

यापुर्वीही बॉलिवूडमध्ये असे चित्र हे अनेकदा पाहायला मिळालेले आहे की एकाच वेळी दोन मोठे चित्रपट प्रदर्शित झालेले आहेत आणि त्याच्यात जोरदार स्पर्धा पाहायला मिळलेली आहे. यावेळी सगळ्यांचेच लक्ष लागून राहिलेले आहे ती म्हणजे 'गदर 2' आणि 'ओह माय गॉड 2' या दोन चित्रपटांची. एकतर हे दोन्ही चित्रपट सिक्वेल आहेत. त्यामुळे पहिल्या कहाणीपेक्षा या चित्रपटाची दुसरी कहाणी प्रेक्षकांसमोर येणार आहे. तेव्हा समीक्षकही या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत. वर म्हटल्याप्रमाणे या दोन्ही चित्रपटांचे ट्रेलर हे प्रदर्शित झालेले आहेत. या चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळालेला आहे. 

हेही वाचा - 'माझी बायको, माझं वेड!' जिनिलियाच्या वाढदिवसानिमित्त रितेशची खास पोस्ट

कोईमोई या संकेतस्थळानं याबद्दल एक वृत्त सादर केले आहे. Gadar 2 या चित्रपटानं पहिल्याच दिवशी आत्तापर्यंत संपुर्ण देशभरात ब्लॉक्ड तिकिटं सोडून 2.60 कोटी रूपयांचे अॅडव्हान्स बुकिंग केले आहे. तर पहिल्या दिवसाच्या हिशोबानं OMG 2 या चित्रपटानं 42 लाख रूपये कमावले आहेत. 

Gadar 2 मध्ये सनी देओल आणि अमीषा पटेल यांची जोडी प्रेक्षकांसमोर येते आहे. 21 वर्षांनंतर आता ही जोडी परत प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. तर अक्षय कुमारचा मोस्ट अवेडेट OMG 2 प्रदर्शित होत असून यावेळी परेश रावल यांच्या जागी पंकज त्रिपाठी दिसणार आहे.