मुंबई : बॉलीवूडची बबली अभिनेत्री काजोल आणि बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण ही जोडी जेव्हा एकत्र आली तेव्हा लोकांना खूप आश्चर्य वाटलं होतं. कारण एकीकडे अजय देवगण खूप मोजकं बोलतो तर, दुसरीकडे काजोलचा स्वभाव खूपच बोलका आहे. काजोलसाठी 5 मिनिटे शांत बसणं किती कठीण आहे हे सर्वांनाच माहीत आहे.
ऑपोजिट अट्रॅक्ट्स हे वाक्य या जोडीला अगदी शोभतं. बहुतेक नातेसंबंधांमध्ये, जिथे कपल एकमेकांना निकनेम देतात किंवा बाबू, शोना म्हणतात. तर दुसरीकडे काजोल तिचा नवरा अजयला, अजय देवगण म्हणून हाक मारते. यामागचं कारण सांगताना काजोलने शोमध्ये अजय देवगणची खूप खिल्ली उडवली आहे.
खरंतर असं घडलं की, 'द कपिल शर्मा शो'मध्ये जेव्हा काजोल सायकलवरून पडल्याच्या इंसीडेंटवर बोलत होती. तेव्हा शाहरुख खानने सांगितले होतं. काजोल तिची स्मरणशक्ती गमावून बसते पण अजयशी बोलून तिची स्मरणशक्ती परत येते. जेव्हा कपिल तिला याचा अर्थ विचारतो तेव्हा काजोल म्हणते, कारण ती अजय देवगण आहे.
काजोलच्या तोंडून अजय देवगण ऐकून कपिल शर्माला खूप आश्चर्य वाटतं. कपिलने काजोलला विचारतो की, तू त्याला शोना किंवा बाबू म्हणत नाहीस? हे ऐकून अभिनेत्रीने शोमध्ये असं काही बोलली ज्यामुळे सगळे हसू लागले. या शोमध्ये तिने अजय देवगणची खूप खिल्ली उडवली होती.
काजोल म्हणाली - मी त्याला अजय देवगण म्हणते कारण ते त्याचं नाव आहे आणि तसही, तुम्हाला अजय कुठल्या एन्गलने शोना वाटतो''... काजोलसोबत शाहरुखनेही अजयची खूप खिल्ली उडवली आणि म्हणाला- सिंघम... बाय द वे हा मजेशीर विनोद फक्त शोसाठी होता. काजोल खऱ्या आयुष्यात अजय देवगणवर किती प्रेम करते हे सगळ्यांनाच माहीत आहे.