'फुकरे रिटर्न्स''ने पार केला ७० कोटींचा आकडा

८ डिसेंबरला प्रदर्शित झालेला फुकरे रिटर्न्स या सिनेमाला प्रेक्षकांनी अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद दिलाय. 

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Dec 21, 2017, 12:56 PM IST
'फुकरे रिटर्न्स''ने पार केला ७० कोटींचा आकडा title=

मुंबई : ८ डिसेंबरला प्रदर्शित झालेला फुकरे रिटर्न्स या सिनेमाला प्रेक्षकांनी अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद दिलाय. 

दुसऱ्या आठवड्यातही सुरु असलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केलीये. बॉक्स ऑफिसवरील गल्ला असाच सुरु राहिला तर लवकरच हा सिनेमा १०० कोटींच्या घरात पोहोचेल.

छोटा बजेट सिनेमा फुकरे रिटर्न्सने आतापर्यंत ७० कोटी रुपयांची कमाई केलीये. दुसऱ्या आठवड्यात शुक्रवारी सिनेमाने ३.३१ कोटी रुपये कमावलेत. शनिवारी या सिनेमाने ५.१५ कोटी रुपये कमावले. रविवारी ७.१० कोटी, सोमवारी २.२५ कोटी रुपये, मंगळवारी २.२० कोटी रुपये कमावले. यासोबत या सिनेमाने आतापर्यंत ७०.४६ कोटी रुपयांची कमाई केलीये.

फुकरे रिटर्न्स हा सिनेमा फुकरे या सिनेमाचा सिक्वेल आहे. मृगदीप सिंग यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात रिचा चड्ढा, वरूण शर्मा, पुलकित सम्राट, अली फजल, मनजोत सिंह, पंकज त्रिपाठी आणि विशाखा सिंह यांच्या मुख्य भूमिका आहेत.