म्हणून शत्रुघ्न सिन्हांनी 'दीवार' आणि 'शोले' अजून पाहिला नाही

शत्रुघ्न सिन्हा यांनी हिंदी सिनेसृष्टीमध्ये सहाय्यक अभिनेता म्हणून पाऊल ठेवले.

Updated: Nov 13, 2017, 10:08 AM IST
म्हणून शत्रुघ्न सिन्हांनी 'दीवार' आणि 'शोले' अजून पाहिला नाही  title=

 मुंबई : शत्रुघ्न सिन्हा यांनी हिंदी सिनेसृष्टीमध्ये सहाय्यक अभिनेता म्हणून पाऊल ठेवले.

कालांतराने 'खलनायक' म्हणून ते प्रसिद्ध झाले. हळूहळू शत्रुघ्न सिन्हा यांची वाढती लोकप्रियता पाहून अनेकांनी त्यांना मुख्य नायकाची भूमिकादेखील ऑफर केली. पण नायकाच्या भूमिकेत 'शोले' आणि 'दीवार' हे चित्रपट न केल्याचे शल्य त्यांच्या मनामध्ये आजही आहे.
 
 'दीवार' आणि 'शोले' चित्रपटाने अमिताभ बच्चन यांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेले. पण बिग बींना हे चित्रपट ऑफर होण्यापूर्वी या चित्रपटाची विचारणा शत्रुघ्न सिन्हा यांनादेखील करण्यात आली होती. मात्र इतर काही कामं हातात असल्याने त्यांनी ही ऑफर नाकारली होती. मात्र 'माझ्या खास दोस्ताने अमिताभ बच्चनने या भूमिका केल्याचा मला आनंद आहे. 'अशी भावनादेखील त्यांनी बोलून दाखवली आहे. 
 
 शत्रुघ्न सिन्हा यांच्या मनात दीवार आणि शोले नाकारल्याचे दुःख इतके आहे की त्यांनी आजतायागत हे चित्रपट पाहिले नाहीत. एका हिंदी कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी आपल्या करिअरमधील चढउतार रसिकांसोबत शेअर केले आहेत. 
 
 खलनायक भूमिकेसाठी वाहवा !  
 शत्रुघ्न सिन्हा हे नायकाच्या भूमिकेत फारसे दिसले नसले तरीही खलनायकाच्या भूमिकेसाठी त्यांनी खूप वाहवा मिळवली. पहिल्यांदा रूपेरी पडद्यावर खलनायकाची एन्ट्री झाली की टाळ्यांचा कडकडाट होत असे. या गोष्टीची दखल परदेशामध्येही घेण्यात आली होती.