...म्हणून फवाद खानविरोधात एफआयआर दाखल

मुलीला पोलियो लस देण्यास नकार दिल्याने फवादविरोधात एफआयआर दाखल

Updated: Feb 21, 2019, 10:35 AM IST
...म्हणून फवाद खानविरोधात एफआयआर दाखल title=

नवी दिल्ली : पाकिस्तानी अभिनेता फवाद खानविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. फवाद खानच्या पत्नीने तिच्या मुलीला पोलियोची लस देण्यास नकार दिल्याने फवाद खानविरूद्ध एफआयआरची नोंद करण्यात आली आहे. पोलियो अभियान टीमने याबाबत लिखित स्वरूपात तक्रार केल्यानंतर लाहौर पोलिसांकडून याप्रकऱणी कारवाई करण्यात आली आहे. 

फवाद खान दूसरी बार बने पिता, पत्नी ने दिया बच्ची को जन्म

पोलियो अभियान करणारी टीम फैसल शहरात असलेल्या अभिनेता फवाद खान याच्या घरी मुलीला पोलियोची लस देण्यासाठी आली होती. परंतु त्यावेळी फवादच्या पत्नीने पोलियोची लस देण्यास विरोध केला. पोलियोची लस देण्यासाठी आलेल्या टीमला तिने अपमानास्पद वागणूक दिली. याप्रकरणी पोलियो अभियान करणाऱ्या टीमकडून लेखी तक्रार दाखल करण्यात आली. 

पाकिस्तान हा पोलियोग्रस्त असलेल्या देशांपैकी एक आहे. पाकिस्ताननंतर नायजेरिया आणि अफगाणिस्तानमध्ये पोलियोग्रस्त रूग्ण अधिक आढळतात. पोलियोमुळे अपंग होण्याचा धोका असतो. यामुळे काही वेळा रूग्णाचा मृत्यूदेखील होऊ शकतो. याआधीदेखील पाकिस्तानात पोलियो अभियानला विरोध करण्यात आला होता. यापूर्वी पोलियो अभियान करणाऱ्या टीमवर सामूहिक हल्ला करण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. 

सध्या फवाद खान दुबईमध्ये राहत आहे. बॉलिवूडमध्ये 'खुबसूरत' चित्रपटातून पदार्पण केलं होतं. या चित्रपटाला खास प्रतिसाद मिळाला नव्हता. हा चित्रपट यूके, यूएई आणि पाकिस्तानमध्येही प्रदर्शित करण्यात आला होते. फवादने तिथे मालिकेत काम केल्यामुळे त्याचे मोठे चाहते आहेत. पाकिस्तानी टीव्ही आणि चित्रपटांमध्ये फवाद खानला सुपरस्टारचा दर्जा देण्यात आला आहे. याशिवाय फवाद अनेक मोठ्या आंतराष्ट्रीय आणि पाकिस्तानी ब्रॅन्डचा ब्रॅन्ड अॅम्बेसेडरही आहे.