मुंबई : सलमान खानचा (Salman Khan) सिनेमा 'राधे योर मोस्ट वॉन्टेड भाई'(Radhe your Wanted Bhai)ईदच्या दिवशी प्रदर्शित झाला आहे. लॉकडाऊनमुळे हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मसोबतच काही सिनेमाघरांतही रिलीज केला आहे. तसेच हा सिनेमा जीपेवर व्यू प्लॅटफॉर्मवर देखील रीलिज झाला आहे. मात्र हा सिनेमा पाहण्यासाठी तुम्हाला 249 रुपये खर्च करावे लागणार आहे. मात्र या सिनेमाला पायरसीची किड लागली आहे. हा सिनेमा अवघ्या 50 रुपयात बाजारात मिळत आहे.
सलमान खानने एक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना पायरसीपासून दूर राहण्यास सांगितलं आहे. मात्र काही लोकं ही गोष्ट मानायला तयार नाहीत. सलमान खानच्या पोस्टनंतर झी एंटरटेनमेंट एंटरप्राइजने मुंबईतील सायबर सेलमध्ये पायरसी विरोधात तक्रार नोंदवली आहे. याप्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्यांनी एका फेसबुक युझर विरोधात गुन्हा देखील नोंदवला आहे.
हा युझर अनधिकृतपणे सिनेमा डाऊनलोड करून पायरसी 50 रुपयांत व्हॉट्सऍपवर विकत असे. रिपोर्टनुसार, सलमान खानच्या सिनेमाची मार्केटिंग हेड अपर्णा देसाईने सांगितलं की, राधे सिनेमा अनधिकृतपणे व्हॉट्सऍपवर पाच भागात विकत आहे. यानंतर झीने एँटी पायरसी एजन्सी एपिक्स सॉफ्टवेअर प्रायवेट लिमिटेडसोबत करार केला आणि पायरेडेट वर्झन काढून टाकण्यास सांगितलं.
रिपोर्टनुसार, अश्विनी राघव नावाच्या फेसबुक अकाऊंटवरून हे पोस्ट करण्यात आलं होतं. 50 रुपयात व्हॉट्सऍपवर राधे सिनेमा उपलब्ध केला जात होता. यासाठी त्यांनी एक जाळं रचलं. त्यांनी एका नंबरवरून सापळा रचला आणि अश्विनीसोबत आणखी दोघांना पकडलं.
सलमानच्या राधे सिनेमाने पहिल्याच दिवशी ओटीटी प्लॅटफॉर्मवर 100 करोड रुपयांची कमाई केली. यानंतर सलमान खानने एकदा पुन्हा कोरोनाच्या काळातही फिल्म इंडस्ट्रीत ट्रेड सेंटर बनला आहे.