हॉरर चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेल्या 'रामसे ब्रदर्स'च्या कुमार रामसे यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

रामसे ब्रदर्सचे प्रख्यात चित्रपट निर्माते कुमार रामसे यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे.

Updated: Jul 8, 2021, 09:48 PM IST
हॉरर चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेल्या 'रामसे ब्रदर्स'च्या कुमार रामसे यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन title=

मुंबई : रामसे ब्रदर्सच्या बहुतेक हॉरर चित्रपटांसाठी स्क्रिप्ट लिहिणारे प्रख्यात चित्रपट निर्माते कुमार रामसे यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. कुमार रामसे 85 वर्षांचे होते. कुमार यांचा मोठा मुलगा गोपाळ यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं की, कुमार यांनी मुंबईतील हिरानंदानी येथे राहत्या घरी शेवटचा श्वास घेतला. कुमार यांच्या कुटुंबात पत्नी शीला आणि तीन मुलं राज, गोपाळ आणि सुनील असा परिवार आहे.

गोपाळ म्हणाले, 'आज सकाळी साडेपाच वाजता हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं. ते आम्हा सर्वांना सोडून निघून गेले. रात्री १२च्या सुमारास अंतिम संस्कार केले जातील. आम्ही पुजारी येण्याची वाट पाहत आहोत. कुमार हे चित्रपट निर्माते एफ यू रामसे यांचे मुलगा होते आणि सात भावांमध्ये मोठा होते. रामसे बंधूंमध्ये केशु, तुलसी, करण, श्याम, गंगू आणि अर्जुन यांचा समावेश आहे. 70 आणि 80च्या दशकात ते कमी बजेटच्या कल्ट चित्रपट बनवायचे.

'पुराण मंदिर' 1984, 'सया' आणि 'खोज' 1989 यासह रामसे ब्रदर्सच्या बहुतेक चित्रपटांसाठी स्क्रिप्ट लिहिण्यात कुमार यांचं महत्त्वपूर्ण योगदान होतं. 'सया' मधील मुख्य भूमिका शत्रुघ्न सिन्हा यांनी साकारली होती आणि  1989ची हिट फिल्म 'खोज' मध्ये ऋषि कपूर आणि नसीरुद्दीन शाह यांच्या मुख्य भूमिका होत्या. 1979. मध्ये 'और कौन?' आणि 1981मध्ये 'दहशत' सारख्या चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली.