मुंबई : 'लता भगवान करे' या सत्तरीच्या आसपास असणाऱ्या महिलेचा प्रेरणादायी प्रवास रूपेरी पडद्यावर झळकणार आहे, या चित्रपटाचा टीझर देखील रिलीज झाला आहे. 'लता भगवान करे' या मूळच्या बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील आहेत, त्यांनी आपल्या पतीचा जीव वाचवण्यासाठी, वैद्यकीय उपचारांना पैसा मिळवण्यासाठी त्यांनी बारामती मॅरेथॉन जिंकण्याचं ठरवलं. नवऱ्याचा जीव वाचवण्याचा एकमेव मार्ग तिला दिसत होता.
विशेष म्हणजे या चित्रपटात लता भगवान करे यांनीच मुख्य भूमिका पार पाडली आहे, त्यांचा मुलगा आणि पती यांनी देखील भूमिका या चित्रपटात केली आहे.
'लता भगवान करे' तेव्हा 65 वर्षांच्या होत्या, नऊवारी साडीवर बिना शूजशिवाय ही महिला धावली आणि बारामती मॅरेथॉन जिंकली. सलग तीन वेळेस या महिलेने मॅरेथॉन जिंकली. लता भगवान करे यांची ही प्रेरणादायी कहाणी रूपेरी पडद्यावर 'लता भगवान करे' या नावाने येणार आहे. दिग्दर्शन नवीन देशबोई यांनी केले आहे.