कलाविश्वाला मोठा धक्का, प्रसिद्ध सेलिब्रिटीचं हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

झगमगत्या विश्वातील एका सिलेब्रिटीने जगाचा आखेरचा निरोप घेतल्यामुळे चाहत्यांमध्ये आणि कलाविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.  

Updated: Aug 16, 2022, 09:34 AM IST
कलाविश्वाला मोठा धक्का, प्रसिद्ध सेलिब्रिटीचं हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू title=

मुंबई : कलाविश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. झगमगत्या विश्वातील एका सिलेब्रिटीने जगाचा आखेरचा निरोप घेतल्यामुळे चाहत्यांमध्ये आणि कलाविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.  ट्रॅकर, इन्फ्लुएंसर, YouTube व्हिडिओ जॉकी आणि चित्रपट समीक्षक म्हणून त्याची ओळख होती. निधनानंतर अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला श्रद्धांजली. फार कमी वयात जगाचा निरोप घेणारा कौशिक एलएम (Kaushik LM) तमिळ आणि तेलुगू इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध होता. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दाक्षिणात्य अभिनेत्री कीर्ती सुरेशने ट्विटरवर कौशिकच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. तिने लिहिलं, "ही बातमी ऐकल्यानंतर माझ्याकडे शब्द नाहीत. घटना अविश्वसनीय आहे!! मनापासून शोक व्यक्त करते... विश्वास बसत नाही की तू आता या जगात नाहीस..!

चित्रपट समीक्षक कौशिक एलएमचं सोमवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. त्याच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाला, चाहत्यांना आणि इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे.