'दीपिका अशी वागेल, वाटलं नव्हतं!' अभिनेत्याने सांगितला फायटरच्या शूटिंग दरम्यान घडलेला प्रसंग

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये  चंदन के आनंद यांनी दीपिकाच्या स्वभावाबाबत खूप मोठं वक्तव्य केलं आहे. तिच्याविषयी हे ऐकताच अनेकांना आश्चर्याचा धक्का बसत आहे.

Updated: Feb 7, 2024, 02:57 PM IST
'दीपिका अशी वागेल, वाटलं नव्हतं!' अभिनेत्याने सांगितला फायटरच्या शूटिंग दरम्यान घडलेला प्रसंग title=

मुंबई : ऋतिक रोशन आणि दीपिका पादुकोण या दिवसांत फायटर या सिनेमामुळे सतत चर्चेत आहेत. या सिनेमाला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमात चंदन के आनंदही आहेत. त्यांनी या सिनेमात पायलटची भूमिका साकारली आहे. नुकतंच त्यांनी फायटर सिनेमात  ऋतिक रोशन आणि दीपिका पादुकोणसोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे. त्यांनी दोन्ही कलाकारांचं भरभरुन कौतुक केलं आहे. इतकंच नाही तर शूटिंग दरम्यान दीपिका पदुकोणसोबतचा एक किस्साही त्यांनी शेअर केला आहे.

या कारणासाठी सगळेच हैराण
नुकतेच दिलेल्या मुलाखतीमध्ये चंदन के आनंद यांनी दीपिकाच्या स्वभावाचं खूप कौतुक केलं सोबतंच दिपीकासोबतचा एक किस्साही त्यांनी शेअर करत सांगितलं की, एकदा शूटिंग दरम्यान अभिनेत्रीने त्यांचा चश्मा उचलून दिला. तिची ही वागणूक पाहून अभिनेता हैराण झाला आणि खूप प्रभावितही झाला. चंदंन यांनी सांगितलं की, दिपीका खूपच नम्र आहे. मला आठवतंय की, एक दिवस सेटवर मी खुर्चीमध्ये बसलो होतो. मी तिला हॅलो बोलण्यासाठी उठलो आणि या दरम्यान माझा चश्मा खाली पडला. यानंतर तिने माझ्यासाठी माझा तो चश्मा उचलला. मी हैराण झालो आहे. आणि तिला विचारलं तु असं का करतेयस. यावंर तिने सांगितलं, अरे ठिक आहे काही प्रॉब्लेम नाही. 
 
ऋतिक रोशनने कौतुक करत सांगितली ही गोष्ट
याशिवाय चंदन यांनी ऋतिक रोशनसोबत काम करण्याचा अनुभवही सांगितला आहे. याविषयी बोलताना सांगितलं की, ते सगळेच खूप गोड लोकं आहेत. एकादिवसातच ऋतिक रोशनसरकडे मी गेलो आणि त्यांना सांगितलं की, तुम्ही स्क्रिनवर जितके कमाल दिसता त्यापेक्षा जास्त हॅण्डसम तुम्ही खऱ्या आयुष्यात आहात. 

म्हणाला स्वप्न सत्यात उतरंल
फायटरमध्ये काम करण्याविषयी चंदनने सांगितलं, माझ्यासाठी या सिनेमात काम करणं एका स्वप्नासारखं होतं. तिथे उपस्थित राहण आणि सगळ्या स्टार्सचा परफॉर्मेन्स पाहणं त्यांचा क्राफ्ट पाहणं एक वेगळाच अनुभव होता. कामाच्या बाबतीत ऋतिक रोशन डेडिकेशन, दिपीकाचं सौंदर्य आणि चार्म अनिल कपूर यांचा अंदाज हे सगळंच जवळून पाहणं माझ्यासाठी एका स्वप्नासारखं होतं. सध्या बॉक्स ऑफिसवर फायटर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. या सिनेमातील प्रत्येक कलाकाराच्या अभिनयाचं प्रेक्षक कौतुक करताना दिसत आहेत. या सिनेमाने कामईच्या बाबतीत अनेक सिनेमांना मागे टाकलं आहे.