दोन जीवलग अभिनेत्यांचा एकाच दिवशी मृत्यू, मैत्रीचे किस्से आजही अजरामर

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अशा काही जोड्या आहेत, ज्यांची मैत्री वर्षानुवर्षे लक्षात राहते.

Updated: May 19, 2021, 10:10 PM IST
 दोन जीवलग अभिनेत्यांचा एकाच दिवशी मृत्यू, मैत्रीचे किस्से आजही अजरामर title=

मुंबई : आपण बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये शत्रुत्वाचे बरेच किस्से ऐकले असतीलच. मात्र बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अशा काही जोड्या आहेत, ज्यांची मैत्री वर्षानुवर्षे लक्षात राहते. यातलीच एक जोडी म्हणजे फिरोज खान आणि विनोद खन्ना. अभिनेते फिरोज खान आणि विनोद खन्ना यांची मैत्री जगजाहीर होती. हे दोन जबरदस्त स्टार एकमेकांच्या अगदी जवळचे होते. आपण लोकांना मैत्रीत आनंद आणि दु: ख शेअर करताना ऐकलं असेलच, मात्र दोघांनीही त्यांच्या मृत्यूचीही तारीख एकच निवडली, फरक फक्त वर्षाचा होता.

फिरोज खान यांनी 27 एप्रिल 2009ला या जगाचा निरोप घेतला, तर विनोद खन्ना यांचं 27 एप्रिल 2017 रोजी निधन झालं. या दोन मित्रांच्या मृत्यूचंही कारण जवळजवळ सारखंच होतं. दोन्ही स्टारर्सना कर्करोगाचं निदान झालं होतं. फिरोजला लंग्स कॅन्सर होता आणि विनोदला ब्लड कॅन्सर होता.

1976 मध्ये रिलीज झालेल्या 'शंकर शंभू' मध्ये फिरोज खान आणि विनोद खन्ना एकत्र दिसले होते. या चित्रपटात दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप पसंतीस उतरली होती. यानंतर हे दोघे 1980 मध्ये 'कुर्बानी' मध्ये एकत्र दिसले होते. या चित्रपटाचं दिग्दर्शन फिरोज खान यांनी केलं होतं. या सिनेमांत फिरोज आणि विनोद व्यतिरिक्त अमरीश पुरी, अमजद खान, झीनत अमान, कादर खान, शक्ती कपूर आणि अरुणा इराणी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला.

फिरोज खान आणि विनोद खन्ना यांना १९८८चा 'दयावान' या चित्रपटात पुन्हा एकत्र काम करण्याची संधी मिळाली. यात विनोद खन्ना आणि माधुरी दीक्षित मुख्य भूमिकेत होते. फिरोज यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. असं म्हटलं जातं की, जेव्हा विनोद खन्ना यांनी इंडस्ट्रीमध्ये यश मिळवलं, तेव्हा ते ओशो आश्रमात गेले, त्यानंतर त्यांना 1986मध्ये बॉलिवूडमध्ये पुन्हा एंट्री घ्यायची होती. यावेळी फिरोज खान यांनीच त्यांना मदत केली आणि 'दयावान' हा चित्रपट बनवला.

काही मोजक्याच सिनेमांत काम करुन फिरोज खान यांनी नाव कमावलं, चित्रपटांत नायकाची भूमिका असो वा खलनायकाची भूमिका असो, फिरोज प्रत्येक भूमिकेत फिट बसायचे. वेलकम हा त्यांचा शेवटचा सिनेमा ठरला.

त्याचवेळी विनोद खन्ना यांनी सुनील दत्त यांच्या अदुर्ती सुब्बा राव दिग्दर्शित 'मन के मीत' या चित्रपटातून आपल्या सिनेकारकिर्दीची सुरुवात केली. या सिनेमात त्यांनी खलनायकाची व्यक्तिरेखा साकारली होती. विनोद खन्ना यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी आपल्या करियरची सुरुवात खलनायकाच्या भूमिकेतून केली आणि नंतर स्वत:ची ओळक नायक म्हणून केली.