संपूर्ण जगात Alia - Ranbir चे असंख्य चाहते; पण राहा मात्र 'यांची' Fan

'...नवीन चाहता जन्माला आला', साता समुद्रापारही रणबीर - आलियाच्या लेकीची चर्चा रंगत आहे. आलियाने मुलीला जन्म दिल्यानंतर कपूर आणि भट्ट कुटुंबात आनंदाचं वातावरण होतं. आलिया-रणबीरने वेगळ्या अंदाजात मुलीच्या नावाची घोषणा केली.   

Updated: Nov 26, 2022, 09:24 AM IST
संपूर्ण जगात Alia - Ranbir चे असंख्य चाहते; पण राहा मात्र 'यांची' Fan title=

Ranbir Kapoor and Alia Bhatt Daughter : अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांनी नुकताच मुलीचं मोठ्या आनंदात स्वागत केलं. आलियाने मुलीला जन्म दिल्यानंतर कपूर आणि भट्ट कुटुंबात आनंदाचं वातावरण होतं. आलिया-रणबीरने वेगळ्या अंदाजात मुलीच्या नावाची घोषणा केली. आलिया - रणबीरने लेकीच्या नावाच्या केलेली घोषणा साता समुद्रापार पोहोचली आहे. आलिया-रणबीरने फुटबॉल क्लब बार्सिलोनाच्या (Barcelona) जर्सीवर लेकीच्या नावाची घोषणा केली. आलियाने लेकीचं नाव राहा ठेवलं आहे. (alia bhatt daughter picture)

सोशल मीडियाच्या माध्यमातून आलिया ही आनंदाची बातमी चाहत्यांपर्यंत पोहोचवली आणि ती साता समुद्रापार पोहोचली. फुटबॉल क्लब बार्सिलोना (Barcelona) देखील आलिया आणि रणबीरच्या लेकीचं खास अंदाजात स्वागत केलं आहे. ( alia bhatt baby pics)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

फुटबॉल क्लब बार्सिलोना (Barcelona)  आलिया-रणबीरच्या लेकीची जर्सी ट्विट करत राहासाठी खास भावना व्यक्त केल्या आहेत. 'आलिया-रणबीर तुमचं अभिनंदन! नवीन Barça fan जन्माला आला आहे. आता बार्सिलोनामध्ये तुम्हा सर्वांना भेटण्यासाठी आम्ही प्रतीक्षा करू शकत नाही.' FC Barcelona ट्विटर अकाउंटवरुन ही पोस्ट करण्यात आली आहे. (alia bhatt baby name)

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर आई-वडील होताच सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षावर पडतं आहे. केवळ चाहत्यांनीच नाही तर सेलिब्रिटींनीही रणबीर आणि आलियाला बाळाच्या (alia bhatt daughter naamkaran puja) आगमनाबद्दल सतत शुभेच्छा दिल्या. या सगळ्यामध्ये आलियानेही आई झाल्यानंतर पहिली पोस्ट टाकली. या पोस्टमध्ये आलियाने सांगितले की ते पालक झाले आहेत आणि गोंडस मुलगी आली आहे.