Sara Ali Khan : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खाननं तिच्या अभिनयाच्या जोरावर सगळ्यांची मने जिंकली. इंडस्ट्रीमध्ये तिला खूप कमी दिवसात लोकप्रियता मिळाली. आज साराचा वाढदिवस असून ती 29 वर्षांची झाली आहे. साराच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अनेकांना असलेल्या प्रश्नावर आपण उत्तर मिळवणार आहोत. तो प्रश्न म्हणजे सारा अली खानचे वडील अर्थात सैफ अली खान हा मुस्लिम आहे आणि तिची आई ही हिंदू मग ती कोणता धर्म स्विकारते.
या सगळ्याची सुरुवात ही सारा अली खानच्या नावावरून झाली होती. सारा तिचं नाव सारा अली खान लिहिते तरी दरवर्षी ती केदारनाथ आणि इतर हिंदू देवस्थळी दर्शनासाठी जाताना दिसते. सारा मंदिरात देखील जाते आणि अजमेर शरीफला चादर चढवण्यासाठी देखील जाते. त्यामुळे सोशल मीडियावर ती चांगलीच ट्रोल होते. एका जुन्या मुलाखतीत सारानं तिच्या या ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं आणि तिचा धर्म कोणता आहे हे सांगितलं होतं.
सारा अली खाननं गलाटा इंडियाला दिलेल्या मुलाखतीत तिच्या धर्माविषयी स्पष्ट वक्तव्य केलं होतं. तिनं सांगितलं की तिचा जन्म हा सेक्युलर कुटुंबात झाला आहे. ते सगळ्या धर्मांचा सन्मान करतात. त्याविषयी बोलताना सारा अली खान पुढे म्हणाली की' माझा जन्म धर्मनिरपेक्ष, सार्वभौम आणि लोकशाही असणाऱ्या कुटुंबात झाला. अन्यायाबाबत उघडपणे बोलण्याची गरज मला कधीच वाटली नाही, कारण विनाकारण बोलण्यावर माझा विश्वास नाही, पण चुकीच्या विरोधात उभं राहण्याची हिंमत आहे.'
पुढे सारानं ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देत म्हटलं की 'जर कोणाला इतकं धार्मिक स्वातंत्र्य मिळतं. तर ते अशा लोकांना काय वाटतं याकडे लक्ष देत नाही. माझी धार्मिक मान्यता, माझ्या जेवणाच्या बाबतीत असलेल्या आवडी-निवडी, मी कसं विमानतळावर जाणार, हा सगळा माझा निर्णय आहे. त्यासाठी मी कधीच माफी मागणार नाही.'
हेही वाचा : श्रीदेवी यांच्या धाकट्या लेकीनं एकाच चित्रपटानंतर खरेदी केली तब्बल 'इतक्या' कोटींची Top Model Car
सारा अली खानच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तिनं 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘केदारनाथ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिनं पहिल्याच चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. त्यानंतर तिनं सिम्बा सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं, जे हिट झाले. तिच्या आताच्या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर सगळ्यात शेवटी ती ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटात दिसली होती. यात विकी कौशलसोबत ती दिसली होती. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. त्याशिवाय ती ‘ऐ वतन मेरे वतन’ या चित्रपटात देखील दिसली होती. या चित्रपटात इमरान हाश्मी देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. या चित्रपटाला समिक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला त्यासोबत अभिनयाची स्तुती केली.