VIRAL : फरहान अख्तरचा गर्लफ्रेंडसोबत पूल फोटो

सोशल मीडियावर ट्रोल 

VIRAL : फरहान अख्तरचा गर्लफ्रेंडसोबत पूल फोटो  title=

मुंबई : फरहान अख्तरने नुकताच आपला वाढदिवस अगदी जल्लोषात साजरा केला. फरहानची आताची गर्लफ्रेंड शिबानी दांडेकरने त्याचा एक फोटो शेअर करत सुंदर मॅसेज देखील लिहिला होता. आता फरहानने शिबानीकरता उत्तर म्हणून एक सुंदर मॅसेज लिहिला आहे. 

फरहान अख्तरने इंस्टाग्रामवर आपला एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत दोघेही स्विमिंग पूलमध्ये दिसत आहेत. सोशल मीडियावर या फोटोला अधिक पसंती असून दोघं एकमेकांसोबत खूप छान दिसत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

As long as I have you As long as you are I’ll never be lost Shine on beautiful star  @shibanidandekar love you loads

A post shared by Farhan Akhtar (@faroutakhtar) on

काहीजण या फोटोला ट्रोल देखील करत आहेत. एका युझरने फोटोवर कमेंट करताना लिहिलं आहे की हे तर लव जिहाद आहे. तुला दुसरी कुणी मुलगी मिळाली नाही. तर दुसऱ्या युझरने म्हटलं आहे की, आपल्या गर्लफ्रेंडसाठी या सगळ्या गोष्टी लिहिल्यास पण कधी पत्नीसाठी असं लिहिलं आहेस का?

फरहान अख्तर गेल्या काही दिवसांपासून गर्लफ्रेंड आणि गायिका शिबानी दांडेकरसोबत अनेक गोष्टींमुळे चर्चेत आला आहे. दोघं अनेकदा एकमेकांसोबत फिरताना स्पॉट झाले आहेत. एवढंच नाही, आता अशी देखील चर्चा आहे की, फरहानने आपल्या वाढदिवसादिवशी शिबानी दांडेकरसोबत साखरपुडा देखील केला आहे. दोघं एप्रिल महिन्यात लग्न देखील करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.