चित्रपट निर्मात्या आणि नृत्यदिग्दर्शिका फराह खानच्या चाहत्यांना गुडन्यूज

फराह खानने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे

Updated: Sep 12, 2021, 07:29 PM IST
चित्रपट निर्मात्या आणि नृत्यदिग्दर्शिका फराह खानच्या चाहत्यांना गुडन्यूज title=

मुंबई : प्रसिद्ध चित्रपट निर्मात्या आणि नृत्यदिग्दर्शिका फराह खान कुंदर यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाचा फटका बसला होता. पण शनिवारी चाहत्यांसोबत एक व्हिडिओ शेअर करत त्यांनी सांगितलं की, त्या आता कोरोनापासून मुक्त झाल्या आहेत. त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर कोरोना रिपोर्टही शेअर केला आहे.

फराह खानने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने हा सगळ्यात उत्साही आहे असं सांगितलंय. smoochythepoochy. फराहचा एक गोंडस कुत्रा देखील व्हिडिओमध्ये दिसत आहे. आम्ही तुम्हाला सांगू की "मैं हूं ना", "ओम शांति ओम" आणि "हॅपी न्यू इयर" सारख्या चित्रपटांसाठी ओळखल्या जाणाऱ्या फराह खान कुंदर यांनी 1 सप्टेंबर रोजी कळवलं होतं की, कोरोनाचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही त्या कोविड पॉझिटीव्ह आल्या होत्या.

काही दिवसांपूर्वी शिल्पासोबत शूटिंग करण्यात आलं होतं
आजकाल फराह खान कुंदर एका कॉमेडी शोमध्ये जज म्हणून आहेत. अलीकडेच त्यांनी शिल्पा शेट्टी कुंद्रासोबत डान्स रिअॅलिटी शोचं शूटिंगही केलं. शोचा हा भाग खूप धमाकेदार होता. ज्यात शिल्पा आणि फराहने खूप मजा केली.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मुंबईत कोरोनामुळे अनेक मृत्यू
याचबरोबर सुत्रानुसार, शुक्रवारी मुंबईत 441 नवीन कोविड -19 केसेस आणि पाच मृत्यूची नोंद झाली आहे. ज्यामुळे शहरातील संक्रमणाची संख्या 7,34,337 आणि मृतांची संख्या 16,011 वर गेली आहे.