मलायका अरोराला 'कमीनी' असं कोण म्हणालं? त्या वक्तव्यामुळे एकच चर्चा...

यासोबतच ती तिच्या गॉर्जियस लूकसाठीही प्रचंड चर्चेत असते.

Updated: Feb 12, 2022, 07:15 PM IST
  मलायका अरोराला 'कमीनी' असं कोण म्हणालं? त्या वक्तव्यामुळे एकच चर्चा... title=

मुंबई : मलायका अरोरा ही अशी एक बॉलिवूड अभिनेत्री आहे, जी आपल्या फिटनेस आणि स्टाईलने लोकांना आश्चर्यचकित करत असते. मलायकाचे फिटनेस व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच पसंत केले जातात.

यासोबतच ती तिच्या गॉर्जियस लूकसाठीही प्रचंड चर्चेत असते. मलायकाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचे काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये मलायकाचा नो मेकअप लूक देखील लोकांना तिचे वेड लावत आहे.

होय, अनेकदा मेकअपमध्ये आणि स्टायलिश दिसणार्‍या मलायकाने तिचे काही अगदी साधे फोटो शेअर केले आहेत, ज्यावर तिचे चाहते प्रेम करत आहेत. या फोटोंमध्ये मलायका पांढर्‍या फ्लोरल प्रिंटच्या शॉर्ट ड्रेसमध्ये आणि खुल्या केसांमध्ये दिसत आहे.

हे शेअर करत मलायकाने 'नो फिल्टर' असे कॅप्शन दिले आहे. पहिल्या फोटोत मलायका क्लोज-अप फोटोमध्ये कॅमेऱ्याकडे बघत पोझ देत आहे, तर दुसऱ्या फोटोत ती खाली बघत पोज देत आहे. 

मलायकाच्या या पोस्टवर चाहत्यांसह बॉलिवूड सेलिब्रिटीही कमेंट करत आहेत. दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर फराह खान लिहिते,  "तू इसी तरह ही बेस्ट दिखती हैं कमीनी"
तर फॅशन डिझायनर मसाबा गुप्ताने लिहिले आहे, "सुंदर मलायका"

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

फराह खान मलायकाला कमीनी असं बोलल्याने तिची कमेंट सध्या खूपच चर्चेत आहे. फराह आणि मलायका जवळच्या मैत्रिणी आहेत. त्यामुळे त्यांच्यात अशी मस्करी बऱ्याचदा पाहायला मिळते.