Yo Yo Honey Singh चं जबरदस्त बॉडी ट्रांसफॉर्मेशन; पाहा फोटो

Yo Yo Honey Sing हा एक प्रसिद्ध बॉलिवूड गायक आहे.

Updated: Mar 27, 2022, 11:01 PM IST
Yo Yo Honey Singh चं जबरदस्त बॉडी ट्रांसफॉर्मेशन; पाहा फोटो title=

मुंबई : Yo Yo Honey Sing हा एक प्रसिद्ध बॉलिवूड गायक आहे. हनी सिंग त्याच्या जबरदस्त रॅपिंग स्टाइलसाठी ओळखला जातो. अलीकडेच हनी सिंगची पत्नी शालिनी सिंगने त्याच्यावर हिंसाचाराचा आरोप केला होता. त्यानंतर सिंगर ऐकाएकी प्रसिद्धीच्या झोतात आला होता. अशा परिस्थितीत आता यो-यो हनी सिंग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र, यावेळी तो कोणत्याही भांडणामुळे नाही तर त्याच्या जबरदस्त बॉडी ट्रान्सफॉर्मेशनमुळे चर्चेत आला आहे. हनी सिंगचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. जो पाहून चाहतेही हैराण झाले आहेत.

खुद्द हनी सिंगने हा फोटो त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की हनी सिंग खूपच स्लिम-ट्रिम आणि फिट दिसत आहे. या फोटोत त्याचे बायसेप्सही स्पष्ट दिसत आहेत. डोळ्यांवर चष्मा आणि हिरवे शूज घातलेला हनी सिंगचा एकूणच लूक पाहून चाहते त्याच्यावर लाईक्स कमेंटचा वर्षाव करत आहेत. फोटो शेअर करत हनी सिंगने कॅप्शनमध्ये लिहीलं की, ''Lets Roll Hyderabad tonight!! Club Prism" हनी सिंगच्या या कॅप्शनवरून कळतं की, तो सध्या त्याच्या काही कार्यक्रमांसाठी हैदराबादमध्ये आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

चाहत्यांपासून ते स्टार्सही हनी सिंगच्या या फोटोवर कमेंट करत आहेत. त्याच्या या फोटोवर जॅजी बी, सारा गुरपाल, जस्सी सिद्धू यांसारख्या स्टार्सच्या कमेंट्स आल्या आहेत. फोटोवर कमेंट करत एका सोशल मीडिया यूजरने 'किंग इज बॅक' असं लिहिलं आहे, तर दुसऱ्याने 'पाजी तुस्सी कमाल दिखते हो' असं लिहिलं आहे. अशाप्रकारे लोकं यो-यो हनी सिंगच्या पोस्टवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.