अर्जुन कपूरचा फॅटे ते फिट प्रवास पाहून व्हाल आश्चर्यचकित; पाहा फोटो

 अर्जुन कपूरचा फिटनेस प्रवास कोणासाठीही प्रेरणादायी ठरू शकतो.

Updated: May 9, 2022, 09:56 PM IST
अर्जुन कपूरचा फॅटे ते फिट प्रवास पाहून व्हाल आश्चर्यचकित; पाहा फोटो title=

मुंबई : अर्जुन कपूरचा फिटनेस प्रवास कोणासाठीही प्रेरणादायी ठरू शकतो. लहानपणापासूनच त्याचं वजन जास्त होतं. पण काही वर्षांत त्याने त्याच्या फिटनेसवर विशेष लक्ष दिलं आणि आता तो एकदम फिट आहे.  त्याने  monday motivation पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने त्याच्या फिटनेस प्रवास शेअर केला आहे.

अभिनेत्याने त्याच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर दोन फोटो शेअर केले आहेत. जे 15 महिन्यांच्या अंतराचं आहे. एक फोटो फेब्रुवारी 2021 मधला आहे. तर दुसरा मे 2022 मधला आहे. अर्जुन कपूरने त्याच्या अॅब्सची झलक शेअर केली आहे आणि त्याला कॅप्शन दिलं आहे की, 15 महिने काम सुरू आहे. या प्रवासाचा मला खूप अभिमान आहे. फेब्रुवारी २०२१ ते मे २०२२ हा काळ खडतर होता. पण मला आनंद आहे.

36 वर्षीय अभिनेत्याने दोन सेल्फी शेअर केले आहेत. ज्यामध्ये तो फॅट ते फिट दिसत आहे. तर दुसऱ्यामध्ये तो त्याचे अॅब्स फ्लॉंट करताना दिसत आहे. पोस्ट शेअर करत त्याने लिहिलं की, मी 15 महिन्यांपासून जे करत आहे. ते भविष्यातही असंच राहील अशी आशा आहे. तसंच त्याने लिहिलं आहे की, मी आता स्वतःवर प्रेम करायला शिकलो आहे. तसंच त्याने लिहिलं आहे की,  माझी सोमवारची प्रेरणा मी स्वत: आहे आणि ते लोकं नाही जे इंस्टा वर स्वतःवर प्रेम व्यक्त करत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

त्याच्या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंटही केल्या आहेत. रणवीर सिंगने लिहिलं, हाय समर. वरुण धवनने कॅल्प लिहिलं आणि परिणीती चोप्राने लिहिलं, "अच्छा किया बाबा."" अर्जुनची बहीण अंशुला कपूरने लिहिले- Yassssss. अर्जूनच्या फोटोवर चाहते देखील लाईक्स कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.