ईरा खानच्या बर्थडेनिमीत्त पूल पार्टीचं आयोजन; बॉयफ्रेंड सोबतचे रोमाँन्टिक फोटो व्हायरल

बॉलीवूड इंडस्ट्रीचा सुपरस्टार आमिर खानची लाडकी ईरा खानने 8 मे रोजी तिचा वाढदिवस साजरा केला.

Updated: May 9, 2022, 09:26 PM IST
ईरा खानच्या बर्थडेनिमीत्त पूल पार्टीचं आयोजन; बॉयफ्रेंड सोबतचे रोमाँन्टिक फोटो व्हायरल title=

मुंबई : बॉलीवूड इंडस्ट्रीचा सुपरस्टार आमिर खानची लाडकी ईरा खानने 8 मे रोजी तिचा वाढदिवस साजरा केला. ज्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. आता काही फोटो समोर आले आहेत, ज्यामध्ये ईरा खानचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरे तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहे.

ईराच्या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो व्हायरल
ईरा खानच्या बर्थडे सेलिब्रेशनला तिचे वडील आमिर खान, आई रीना दत्ता, बॉयफ्रेंड नुपूर शिखर आणि जवळचे मित्र उपस्थित होते. फोटो पाहून असं दिसत आहे की, ईराचा वाढदिवस खास बनवण्यासाठी पूल पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या खास प्रसंगी नुपूर शिखरेने काही फोटो पोस्ट करत गर्लफ्रेंड ईराला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

नूपुरने केला आयरावर प्रेमाचा वर्षाव
पहिल्या फोटोमध्ये इरा खान केक कट करताना दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये ईरा खुर्चीवर बसून कॅमेऱ्याकडे बघून  हसताना दिसत आहे. त्याचबरोबर, तिसरा फोटो खूप रोमँटिक आहे. नुपूर शिखरे गर्लफ्रेंड आयरासोबत पूलमध्ये रोमान्स करताना दिसत आहे. या फोटोत त्याने आयराला मिठित घेतलं आहे.