एकाच क्लिनिकमधून बाहेर पडले सनी देओल अन् अक्षय कुमारची सासू; चर्चांना उधाण! चाहते संभ्रमात

Sunny Deol Dimple Kapadia Video: यापूर्वीही या दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावरुन व्हायरल झालेला. त्यावेळेचा व्हिडीओ लंडनमध्ये शूट करण्यात आला होता. आता एक नवा व्हिडीओ समोर आला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Dec 15, 2023, 10:26 AM IST
एकाच क्लिनिकमधून बाहेर पडले सनी देओल अन् अक्षय कुमारची सासू; चर्चांना उधाण! चाहते संभ्रमात title=
यापूर्वीही दोघे एकत्र दिसून आले

Sunny Deol Dimple Kapadia Video: अभिनेता सनी देओल मागील काही महिन्यांपासून सतत चर्चेत आहे. आधी मुलगा करणचं लग्न आणि त्यानंतर 'गदर-2'च्या प्रदर्शनानंतर चित्रपट सुपर हीट ठरल्याने सनी चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी सनी देओलचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये सनी धडपडत चालताना दिसत आहे. सनी देओल मद्यपान करुन चालत होता की काय अशी शंका अनेकांनी हा व्हिडीओ पाहून घेतली. मात्र नंतर हा एका जाहिरातीचा भाग असल्याचं स्पष्ट झालं. मात्र आता सोशल मीडियावर व्हायरल झालेला सनी देओलच्या एका व्हिडीओ खळबळ उडाली आहे. या व्हिडीओमध्ये सनी देओल एका डॉक्टरांच्या क्लिनिकमधून बाहेर येताना दिसत आहे. आता या व्हिडीओत खळबळजनक काय असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर हा व्हिडीओ चर्चेत येण्यामागील कारण आहे ज्येष्ठ अभिनेत्री डिंपल कपाडिया!

आता काय दिसून आलं?

डॉक्टरांच्या ज्या क्लिनिकमधून सनी देओल बाहेर आला त्याच ठिकाणी डिंपल कपाडिया दिसून आल्या. त्यामुळे पुन्हा एकदा सनी देओल आणि डिंपल कपाडिया यांच्या नात्याबद्दलची चर्चा सुरु झाली आहे. या व्हिडीओमध्ये सनी देओल आणि डिंपल कपाडिया काही मिनिटांच्या फरकाने एकामागोमाग एक बाहेर पडल्याचं दिसत आहे. बाहेर आल्यानंतरही हे दोघे आपआपल्या कारने निघून गेले. तरीही एकाच क्लिनिकमधून हे दोघे काही वेळाच्या अंतराने बाहेर पडल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

प्रश्नांचा भडिमार

डिंपल कपाडिया यांनी काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. तर सनी देओलने बेझ टी-शर्ट घातलेला. सोशल मीडियावर या दोघांच्या व्हिडीओने चर्चांना उधाण आलं आहे. व्हिडीओ पाहून चाहत्यांनी प्रश्नांचा भडिमार केला आहे. नेमकं या दोघांमध्ये काय चाललं आहे असं अनेकांनी विचारलं आहे. अनेक प्रश्न चाहत्यांनी विचारले असून यापूर्वीही सनी देओल आणि डिंपल कपाडिया एकत्र दिसून आले होते. 

यापूर्वीही व्हायरल झालेला व्हिडीओ

काही वर्षापूर्वी डिंपल कपाडिया आणि सनी देओल यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. व्हिडीओमध्ये दोघेही लंडनच्या रस्त्यांवर हातात हात घालून बसल्याचं दिसत होतं. या व्हिडीओमुळे मनोरंजन सृष्टीमध्ये एकच खळबळ उडाली होती. सनी देओल आणि डिंपल कपाडिया यांच्या प्रेमप्रकरणाची एकेकाळी बॉलिवूडमध्ये चांगलीच चर्चा होती. 

डिंपल आणि सनीमधील जवळीक वाढली

राजेश खन्नांपासून विभक्त झाल्यानंतर डिंपल कपाडिया आणि सनी देओल यांच्यातील जवळीक वाढल्याचं दिसून आलं. त्यामुळे या दोघांच्या नात्याबद्दल वेळोवेळी चर्चा होताना दिसून आलं. आता पुन्हा हे दोघे एकाच क्लिनिकमधून बाहेर येताना दिसल्याने नव्यानं हा विषय चर्चेत आला आहे हे ही नक्कीच. डिंपल कपाडिया यांची कन्या अभिनेत्री ट्विंकल खन्ना आहे. डिंपल अभिनेता अक्षय कुमारच्या सासू आहे.