VIDEO VIRAL : 'गावठी नोरा..., 'फ्रॅंड्री' फेम अभिनेत्री विचीत्र हावभावांच्या व्हिडीओमुळे ट्रोल

'फॅंड्री' मधील अभिनेत्रीचा तो व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. तिच्या व्हिडीओवर कमेंट करत नेटकरी तिच्याविषयी अनेक गोष्टी बोलत आहेत. 

Updated: Feb 23, 2023, 03:50 PM IST
VIDEO VIRAL : 'गावठी नोरा..., 'फ्रॅंड्री' फेम अभिनेत्री विचीत्र हावभावांच्या व्हिडीओमुळे ट्रोल title=

Rajeshwari Kharat Viral Video : मराठी दिग्दर्शक नागराज मंजुळे ( Nagraj Manjule) यांनी आता पर्यंत एकापेक्षा एक चित्रपट दिले आहेत. त्यांच्या प्रत्येक चित्रपटाची एक वेगळी कहाणी आहे. या चित्रपटांमध्ये 'सैराट' (Sairat), झुंड (Jhund) आणि फॅंड्रीसारखे (Fandry) अनेक चित्रपट आहेत. 'फॅंड्री' या चित्रपटाविषयी तर काय बोलायचे या चित्रपटाचे देखील सगळीकडून कौतुक करण्यात आले होते. नागराज मंजुळे यांनी ज्या कलाकारांना अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यास मदत केली, आज ते सगळे कलाकार लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. दरम्यान, 'फॅंड्री' चित्रपटात शालूची भूमिका साकारणारी राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharat) सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला धारेवर धरलं आहे. अनेकांनी तिला प्रचंड ट्रोल केलं आहे. 

राजेश्वरीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये राजेश्वरीनं एक रील व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये राजेश्वरीनं एकदा गुलाबी रंगाचं टॉप आणि निळ्या रंगाची जीन्स परिधान केली आहे. तर त्यासोबतच गुलाबी रंगाचा फ्लोरल प्रिंटचा एक ड्रेस देखील परिधान केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत राजेश्वरीनं कॅप्शन दिलं की 'Dirty Little Secret.' राजेश्वरीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. मात्र, तिनं शेअर केलेल्या या रील व्हिडीओमुळे तिला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी राजेश्वरीला ट्रोल केलं आहे. खरंतर राजेश्वरीनं बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीच्या 'डर्टी लिटल सीक्रेट' गाण्यावर डान्स केला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : Hera Pheri 3 मागोमाग आता Welcome 2 खळखळून हसवाणार; मजनू भाईला तुम्ही भेटणार ना?

या व्हिडीओवर कमेंट करत राजेश्वरीला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'म्हणून च नागराज सर तुला पुन्हा चान्स देईनात.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'गावठी नोरा. ...अंग वळत नाही उगाच काहीतरी अचकट विचकट हावभाव जशी झोपेतून उठून आलीय. एनर्जी नसते कधीच तुझ्या नाचण्यात तुझ्या हून छान पोर नाचतात वरातीत.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'फिल्ममध्ये चान्स मिळेना म्हणून असले व्हिडिओ करत आहे वाटतं.. म्हणजे असले व्हिडिओ डायरेक्टरनं बघितले तर निदान मस्तराम सारख्या वेब सिरीज मध्ये तरी काम मिळेल. तुझा हा व्हिडिओ बघितल्यावर असं वाटतंय कि तुला बहुतेक वेब सिरीज मध्येच काम करायचे आहे.. कारण आजकाल वेब सिरीज मधीलच ऍक्ट्रेस ज्यास्त फेमस आहेत.'