'सलमान खानशी लग्न कर' सल्ला देणाऱ्याला अमीषा पटेलचा रिप्लाय; म्हणाली, 'त्याचं लग्न..'

Ameesha Patel on Marrying Salman Khan : अमीषा पटेलनं चाहत्यांशी संपर्क साधला असता एका चाहत्यानं सलमानशी लग्न करण्याचा सल्ला दिला. 

दिक्षा पाटील | Updated: Jun 23, 2024, 10:26 AM IST
'सलमान खानशी लग्न कर' सल्ला देणाऱ्याला अमीषा पटेलचा रिप्लाय; म्हणाली, 'त्याचं लग्न..' title=
(Photo Credit : Social Media)

Ameesha Patel on Marrying Salman Khan : बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेल ही लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. अमीषानं अभिनेता हृतिक रोशनसोबत 'कहो ना प्यार है' या चित्रपटात काम करत अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. तर अमीषा सगळ्यात शेवटी 'गदर 2' या चित्रपटात दिसली. त्यानंतर ती सतत चर्चेत असते. अमीषा अजूनही बॅचलर आयुष्य आनंदानं जगते. तिनं नुकताच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संपर्क साधला. त्यावेळी तिच्या लग्नाविषयी आणि नात्याविषयी विचारण्यात आलं. त्यावेळी अमीषानं सडेतोड उत्तर दिलं आहे. मात्र, तिनं दिलेल्या उत्तरानं नक्कीच सगळ्यांना हसू अनावर होईल. 

अमीषा पटेलनं तिच्या चाहत्यांसोबत आधीचं ट्विटर म्हणजेच आताच्या X अकाऊंटवरून चाहत्यांशी 'Ask Me Anything' सेशन केलं. त्यावेळी अमीषाला एका नेटकऱ्यानं विचारलं की ती लग्न कधी करणार? त्यावर उत्तर देत अमीषा म्हणाली मिस्टर राइटच्या शोधात होती पण तो तिला भेटलाच नाही, नाही तर तिचं लग्न खूप आधीच झालं असतं. तर दुसऱ्या एका चाहत्यानं की अमीषाला सल्ला दिला की तिनं सलमान खानसोबत लग्न करायला हवं, कारण इंडस्ट्रीत ते दोघेही अविवाहीत आहेत. अमीषानं यावर चाहत्यांना विचारलं की 'ही काय चित्रपटाची पटकथा आहे? सलमानचं लग्न नाही झालं, माझं पण नाही झालं तर आम्ही लग्न करुन घेऊ. यात काय तथ्य आहे.' 

अमीषा आणि सलमानविषयी बोलायचं झालं तर त्या दोघांनी 2002 मध्ये 'ये है जलवा' या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. 'बॉलिवूड हंगामा' ला दिलेल्या मुलाखतीत अमीषानं एकदा म्हटलं होतं की तिचा आणि सलमानचा चित्रपट फ्लॉप होण्याचं कारण म्हणजे सलमानची रन केस होणार होती. तिनं म्हटलं होतं की हा चित्रपट डेव्हिड धवननं बनवलेल्या चित्रपटांमध्ये सगळ्यात उत्तम चित्रपटांपैकी एक होता. त्याशिवाय सलमान देखील या चित्रपटात चांगला दिसत होता. मात्र, हिट-अॅन्ड-रन प्रकरणामुळे मीडियाचं लक्ष चित्रपटाशिवाय त्याकडे वळालं होतं. 

हेही वाचा : 'एका दिवसासाठी 5-10 लाख...', पैसे उधळत धुमधडाक्यात लग्न करणाऱ्यांचे 'सैराट' फेम अभिनेत्यानं उघडले डोळे

सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत अमीषानं आमिर खान आणि सलमान खानसोबत असलेल्या तिच्या नात्याविषयी सांगितलं. तिनं सांगितलं की एकीकडे आमिर खूप प्रोफेशनल आहे. तर दुसरीकडे सलमान हा मस्तीखोर मुलगा आहे. तिनं हे देखील सांगितलं होतं की संजय दत्त तिच्यासाठी एक योग्य वर शोधत होता. अमीषानं याविषयी सांगितलं होतं की ती इंडस्ट्रीसाठी खूप लहान आहे आणि त्याची इच्छा आहे की तिचं लग्न चांगल्या मुलाशी व्हायला हवं.