मुंबई : प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तवच्या (Raju Srivastav Health Update) उत्तम आरोग्यासाठी चाहते प्रार्थना करतायेत. आपला लाडका राजू लवकर बरा व्हावा अशी प्रत्येक चाहत्याची इच्छा आहे. आता कॉमेडियनच्या तब्येतीची चांगली बातमी समोर आली आहे. राजू श्रीवास्तव यांचे मुख्य सल्लागार अजित सक्सेना यांनी कॉमेडियनच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट दिली आहे. (famous comedian raju shrivastav health update given ajit saxena aiims hospital)
"राजू यांचे हातपाय हालू लागले आहेत. ते डोळे उघडून पत्नी शिखा श्रीवास्तवकडे पाहतायेत. राजू शिखाच्या हाताला स्पर्श करुन मी लवकरच बरा होईल असं सांगण्याचा प्रयत्न करतायेत", अशी माहिती अजीत सक्सेना यांनी दिली.
राजू यांच्यावर 10 ऑगस्टपासून दिल्लीतील एम्समध्ये उपचार सुरु आहेत. राजू हॉटेलच्या जिममध्ये वर्कआउट करत होते. ट्रेडमिलवर व्यायाम करत असताना त्यांना छातीत दुखू लागले आणि त्यानंतर ते पडले. राजू श्रीवास्तव यांना त्यांच्या जिम ट्रेनरने तातडीने रुग्णालयात नेलं. तेव्हापासून राजू दिल्लीच्या एम्समध्ये डॉक्टरांच्या कडक देखरेखीखाली आहेत. आता हळूहळू राजूच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.