रशियन आहे पवन कल्याणची तिसरी बायको; जाणून घ्या ॲना लेझनेवाबद्दल 5 रंजक गोष्टी

पवन कल्याण आणि ॲना लेझनेवा विभक्त होणार असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. ॲना लेझनेवा कुटुंबाच्या कार्यक्रमाला गैरजर राहिल्याने ही चर्चा सुरु झाली होती.   

शिवराज यादव | Updated: Jun 14, 2024, 10:01 PM IST
रशियन आहे पवन कल्याणची तिसरी बायको; जाणून घ्या ॲना लेझनेवाबद्दल 5 रंजक गोष्टी title=

दाक्षिणात्य सुपरस्टार आणि राजकीय नेता पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षाला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जबरदस्त यश मिळालं आहे. एनडीएमध्ये सहभागी असणाऱ्या जनसेना पक्षाने लढलेल्या सर्व जागा जिंकत इतिहास रचला आहे. राज्याच्या विधानसभेत पवन कल्याण यांच्या पक्षाचे 21 आमदार असून पक्षनेतेपदीही निवड झाली आहे. तसंच आंध्र प्रदेशच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. 

पवन कल्याण यांनी निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर घरी पत्नी ॲना लेझनेवाकडून जंगी स्वागत करण्यात आलं. ॲना लेझनेवाने पतीला ओवाळतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायर झाला होता. ॲना लेझनेवा या पवन कल्याण यांच्या तिसऱ्या पत्नी आहेत. पहिला दोन्ही पत्नींना त्यांनी घटस्फोट दिला आहे. 

कोण आहे ॲना लेझनेवा?

1) ॲना लेझनेवाचा जन्म रशियामध्ये (1980) मध्ये झाला आहे. ती एक मॉडेल-अभिनेत्री आहे, 2011 मध्ये 'तीन मार' चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान तिची पवन कल्याण यांच्याशी भेट झाली होती. दोन वर्ष डेट केल्यानंतर अखेर 30 सप्टेंबर 2013 रोजी ते विवाहबंधनात अडकले. ॲना  ही पवन कल्याण यांची तिसरी पत्नी आहे. 

2) या जोडप्याला मार्क शंकर पावनोविच नावाचा एक मुलगा आहे. तसंच लेझनेव्हाला तिच्या पहिल्या लग्नापासून पोलेना अंजना पावनोवा ही मुलगी आहे.

3) असं सांगितलं जातं की, मॉडेलिंग करिअरसह ॲना लेझनेवाकडे सिंगापूरमधील हॉटेल चेनती मालकी आहे. त्यांच्याकडे रशिया आणि सिंगापूर या दोन्ही देशांतील मालमत्तांसह सुमारे 1800 कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचे सांगितले जाते.

4) पवन कल्याण यांचं हे तिसरं लग्न असल्याने ॲना लेझनेवासमोर अनेक आव्हानं होती. 1997 मध्ये पवन कल्याण यांनी 19 वर्षीय नंदिनीशी लग्न केलं होतं. 2008 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर 2009 मध्ये अभिनेत्री रेणू देसाईशी लग्न केले आणि 2012 मध्ये घटस्फोट झाला. त्यांना अकिरा नंदन आणि आध्या ही दोन मुलं आहेत. 

5) तेलगू स्टार वरुण तेजचा साखरपुडा आणि  राम चरण-उपासना यांच्या मुलीचा पाळणा समारंभ यासारख्या महत्त्वाच्या कौटुंबिक मेळाव्यात ॲना लेझनेवा उपस्थित नसल्याने नात्यात दुरावा आल्याची चर्चा होती. पण ॲना लेझनेवा पवन कल्याण यांच्या सर्व सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी असते. नुकतंच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मिळवलेल्या घवघवीत यशानंतर पतीच्या स्वागताला ॲना लेझनेवा हजर होती. यामुळे ते विभक्त होणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.