fact check : अजय देवगणला दिल्लीत मारहाण? जाणून घ्या व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य

 व्हायरल व्हिडिओनुसार दिल्लीत मध्यरात्री दोन गटात मारहाण झाली होती, व्हायरल झालेल्या या व्हीडिओमध्ये अजय देवगणचे नाव येत आहे

Updated: Mar 29, 2021, 04:26 PM IST
fact check : अजय देवगणला दिल्लीत मारहाण? जाणून घ्या व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण नेहमीच आपल्या अनोख्या अभिनयामुळे ओळखला जातो. नुकताच अजयच्या तान्हाजी सिनेमाला अनेक पुरस्कारही देण्यात आले आहेत. सोशल मीडियावर अजय त्याच्या फोटो आणि व्हिडीओमुळे कायम चर्चेत असतो. यावेळी अजय एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे. अजयचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, हा व्हीडीओ अत्यंत धक्कादायक आहे. व्हायरल व्हिडिओनुसार दिल्लीत मध्यरात्री दोन गटात मारहाण झाली होती, व्हायरल झालेल्या या व्हीडिओमध्ये अजय देवगणचे नाव येत आहे. सोशल मीडियावर या व्हीडिओवर दावा केला जात आहे की, व्हायरल व्हिडिओत मारहाण झालेली व्यक्ती दुसरी कोणी नाही तर बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आहे

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
सोशल मीडियावरील व्हायरल होणाऱ्या एका व्हीडिओवर असा दावा केला जात आहे की, व्हीडिओमध्ये दिसणारी व्यक्ती अजय देवगणसारखीच दिसत आहे, व्हायरल व्हीडिओमध्ये असा दावा केला गेला आहे की, अजय देवगण या घटनेत आहे, त्यावेळी तो नशेच्या अवस्थेत होता. अजयचं कार पार्किंगवरुन भांडण सुरू आहे, त्यानंतर हे प्रकरण मारहाणीपर्यंत पोहचलं.

परंतु व्हायरल होत असलेल्या व्हीडिओमध्ये स्पष्टपणे कोणाचाही चेहरा दिसत नाही आहे. व्हीडिओमध्ये दिसत असलेला व्यक्ती अजयसारखा दिसत असला, तरी हा व्हीडिओ अजयचाचं आहे असं म्हटले जाऊ शकत नाही. तसेच अजय देवगननेही म्हटलं आहे, बरेच महिने झाले मी दिल्लीत गेलेलो नाही, त्यामुळे हा व्हीडिओ माझा असण्याचा संबंधच नाही.

नुकताच एका नेटकऱ्यानं या संपूर्ण घटनेचा एक व्हीडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये पांढरा शर्ट घातलेला व्यक्ती मारहाण करताना दिसत आहे. व्हीडिओ पोस्ट करताना या व्यक्तीने लिहिले आहे - 'तो अजय देवगण आहे की नाही हे मला माहिती नाही. मात्र, या व्हीडीओत शेतकरी आंदोलनाबाबत लोक संताप व्यक्त करताना दिसत आहेत. हा व्हीडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे, असा दावा केला जात आहे की, तो अजय देवगणच आहे. 'तर काही लोक म्हणत आहेत की, हा व्हिडिओ दिल्ली विमानतळावरचा आहे परंतु या व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती अजय नाही तर कुणीतरी दुसरी आहे

अजय देवगनने नाव बदलले
अलीकडे अजय देवगणने सोशल मीडियावर म्हटलं आहे की, प्रत्येकानं मला अजय देवगण म्हणणं थांबवलं पाहिजे. अजयने म्हटले आहे की, दुआ में याद रखना, नाम है सुदर्शन.. या पोस्टनंतर चाहत्यांना समजले आहे की, अजय त्याच्या आगामी सिनेमाचं प्रमोशन करत आहे. आता हे तेव्हाच पहायला मिळेल की, त्याचं सुर्दशन हे नाव अजयच्या कोणत्या सिनेमात असेल. मात्र अजयचं खरं नाव विशाल आहे. अजय देवगन लवकरच मैदान चित्रपटात दिसणार आहे.